व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र चंद्रपूरच्या श्री विठ्ठल मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जाचा निर्णय अंतिम टप्प्यात; मुनगंटीवारांचा शासन...

चंद्रपूरच्या श्री विठ्ठल मंदिराला ‘ब’ वर्ग दर्जाचा निर्णय अंतिम टप्प्यात; मुनगंटीवारांचा शासन स्तरावर जोरदार पाठपुरावा!

चंद्रपूरकरांच्या श्रद्धेच्या विषयासाठी मुख्यमंत्र्यांकडे घेतली होती भेट; महापौर, उपमहापौर आणि चंद्रपूरकरांच्या मागणीला मुनगंटीवारांचा भक्कम पाठिंबा

Chandrapur : चंद्रपूर शहराचे श्रद्धास्थान आणि ऐतिहासिक वारशाचे प्रतीक असलेल्या श्री विठ्ठल मंदिर देवस्थानास शासनाचा ‘ब’ वर्ग दर्जा मिळण्याचा मार्ग आता मोकळा होण्याच्या दिशेने असून, या प्रस्तावावरील निर्णय अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. चंद्रपूरचे महापौर, उपमहापौर आणि चंद्रपूरकर नागरिकांनी केलेल्या मागणीला प्रतिसाद देत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शासन स्तरावर सातत्याने ठाम भूमिका मांडली असून, या विषयाचा स्वतः जातीने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. त्यांच्या मागणीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत संबंधित अतिरिक्त मुख्य सचिवांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून प्रस्तावाला मान्यता देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत श्री विठ्ठल मंदिराच्या ‘ब’ वर्ग दर्जाबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी श्री विठ्ठल मंदिर देवस्थानाच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा विचार करून या मंदिराला शासनाचा ‘ब’ वर्ग दर्जा मिळावा, यासाठी सातत्याने शासन स्तरावर भूमिका मांडली आहे. चंद्रपूर शहराला सुमारे ८०० वर्षांचा समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला असून, या वारशात श्री विठ्ठल मंदिराचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. अनेक दशकांपासून हे मंदिर हजारो भाविकांच्या श्रद्धेचे आणि भक्तिभावाचे केंद्र राहिले आहे. आषाढी व कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने निघणारी भव्य रथयात्रा, विठ्ठलनामाचा अखंड गजर, कीर्तन-भजनांचे कार्यक्रम आणि वारकरी संप्रदायाचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे या देवस्थानाने चंद्रपूरच्या धार्मिक व सांस्कृतिक जीवनात अनन्यसाधारण स्थान निर्माण केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही साशंकता; विमानतळ भूसंपादनाला विरोध कायम!

मंदिरात वर्षभर भाविकांची वर्दळ असते. विशेषतः आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या उत्सवांमध्ये हजारो भाविक सहभागी होतात. वाढती भाविकसंख्या लक्षात घेता मंदिर परिसरातील स्वच्छता, पाणीपुरवठा, भाविकांसाठी आवश्यक सुविधा तसेच उत्सव काळातील व्यवस्थापन अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त झाल्यास शासनाच्या माध्यमातून आर्थिक व प्रशासकीय सहाय्य उपलब्ध होऊन या सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

या मागणीसाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे सविस्तर भूमिका मांडली होती. एवढेच नव्हे, तर शासनाच्या नियमानुसार ‘ब’ वर्ग दर्जा प्रदान करण्यासाठी आवश्यक असलेला चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीचा ठरावही त्यांच्या विनंतीनुसार पारित करण्यात आला आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या विषयाची तातडीने दखल घेत नगर विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना आवश्यक कार्यवाही करून मान्यता देण्याचे निर्देश दिले.

लोकसभेसाठी अडीच वर्षे आधीच मोर्चेबांधणी संभाव्य उमेदवाराची मतदारसंघात सक्रियता!

आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी श्री विठ्ठल मंदिर देवस्थानाच्या ‘ब’ वर्ग दर्जासाठी शासन स्तरावर सुरू ठेवलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा विषय आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १५ दिवसांत प्रस्तावाला मान्यता देण्याचे निर्देश दिल्यानंतर अंतिम प्रशासकीय प्रक्रियेवरही आ. मुनगंटीवार स्वतः जातीने लक्ष ठेवून आहेत. चंद्रपूरच्या जनभावनेशी आणि अनेक पिढ्यांच्या श्रद्धेशी ऋणानुबंध जपणाऱ्या या देवस्थानाला योग्य शासकीय दर्जा मिळावा, यासाठी मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे आता चंद्रपूरकरांचे लक्ष शासनाच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.

error: Content is protected !!