The Vice President gave a message of value-based, ethical leadership to the youth : २९ व्या भारतीय युवा संसद परिषदेच्या भव्य उद्घाटन
Nagpur कोणत्याही देशाचे सामर्थ्य तिथल्या तरुणांच्या खांद्यावर असते. केवळ सत्ता किंवा पद मिळवणे म्हणजे नेतृत्व नव्हे, तर चारित्र्यनिर्मिती हाच खऱ्या आणि भक्कम नेतृत्वाचा पाया आहे. तुमचे आयुष्य चारित्र्यसंपन्न असेल, तरच तुमचे नेतृत्व समाजावर प्रभाव टाकू शकेल, असे प्रतिपादन देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी आज नागपुरात केले.
रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात आयोजित २९ व्या भारतीय युवा संसद परिषदेच्या भव्य उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल जिष्णु देव वर्मा, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आरएसएसचे सह-सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपाल, केंद्रीय संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी आणि राष्ट्रीय संयोजक आशुतोष जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती.
gautam-singhania : उद्योग विश्वात खळबळ; गौतम सिंघानिया यांच्या स्पीडबोटीचा अपघात
उपराष्ट्रपतींनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पाचा आवर्जून उल्लेख केला. “देशातील ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील आहे. ही भारताची मोठी जमेची बाजू आहे. केंद्र सरकारने तरुणांच्या शिक्षण आणि कौशल्यासाठी आखलेली धोरणे देशाला महासत्तेच्या दिशेने घेऊन जात आहेत, असे म्हणत त्यांनी केंद्र सरकारच्या कामाची पावती दिली.
रेशीमबाग हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बालेकिल्ला मानला जातो. याच भूमीवरून उपराष्ट्रपती आणि डॉ. कृष्ण गोपाल यांची उपस्थिती बरेच काही सांगून जाणारी आहे. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनीदेखील केवळ आर्थिक प्रगती म्हणजे विकास नव्हे, तर त्यात सामाजिक आणि सांस्कृतिक योगदानाचे मूल्यही तितकेच मोठे आहे, असे सांगत सांस्कृतिक राष्ट्रवादाचा धागा पकडला.
Mhada flats : म्हाडाच्या आलिशान फ्लॅटवर नेत्यांचा १४ वर्षांपासून ‘फ्री’ ताबा
गेल्या दोन दशकांपासून भारतीय युवा संसद नॅशनल ट्रस्ट करत असलेल्या कार्याचा गौरव उपराष्ट्रपतींनी केला. ही परिषद केवळ चर्चेचे व्यासपीठ नसून भविष्यातील जबाबदार आणि ध्येयवादी नागरिक घडवणारी पाठशाळा आहे, अशा शब्दांत त्यांनी आशुतोष जोशी यांच्या नेतृत्वाखालील टीमचे कौतुक केले.








