Padalkar Vs jayant patil : अशोक खरातकडून ‘रक्ताने आंघोळ’ घातल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ!

gopichand-padalkar-allegations-jayant-patil-ashok-kharat-case-maharashtra-politics : जयंत पाटलांवर गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप

Mumbai: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आणि सनसनाटी आरोप केले आहेत. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना पडळकरांनी दावा केला की, अशोक खरातने जयंत पाटील यांना राजकीय प्रगतीसाठी रक्ताने आंघोळ घातली होती.

पडळकरांनी पुढे सांगितले की, जयंत पाटील आपल्या मुलासह अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिरात गेले होते आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. खरातवर नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला जात असल्याने जयंत पाटील यांच्याशी संबंधित विधींमध्ये वापरलेले रक्त नेमके कोणाचे होते, हे समोर येणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या प्रकरणात पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुरोगामी भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एकीकडे फुले, शाहू आणि आंबेडकर यांच्या विचारांचा उल्लेख करायचा आणि दुसरीकडे अशा भोंदूबाबांना घरी बोलावून पूजा करायची, असा विरोधाभास राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून दिसून येत असल्याची टीका त्यांनी केली.

Ashok kharat case : खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे; अमानुष अत्याचारांची माहिती सभागृहात

जयंत पाटील हे जलसंपदा मंत्री असताना अशोक खरातला सुमारे ४० किलोमीटर लांबीची पाण्याची पाईपलाईन उपलब्ध करून देण्यात आल्याचा आरोपही पडळकरांनी केला. यामध्ये त्यांच्या भूमिकेची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच अशोक खरात जयंत पाटील यांच्या घरी पूजा करत असल्याची चर्चा असल्याचेही त्यांनी नमूद केले.

महिला अत्याचाराच्या मुद्द्यावरही पडळकरांनी प्रश्न उपस्थित करत जयंत पाटील यांची भूमिका काय आहे, याची चौकशी झाली पाहिजे, असे सांगितले. अशोक खरातवर गर्भवती महिलांसह अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप आहेत, अशा व्यक्तीशी संबंध असलेल्या राजकीय नेत्यांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय पडळकरांनी वादग्रस्त विधान करत जयंत पाटील यांनी अशोक खरातच्या प्रभावाखाली काही अंधश्रद्धाजन्य कृत्ये केली असावीत, असा टोला लगावला. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वातावरण आणखी तापले आहे.

Nagpur Municipal corporation : हायकोर्टाचा ‘बडगा’ की मनपाची ‘मेहेरबानी’?

दरम्यान, या सर्व आरोपांमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून अशोक खरात प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवे दावे आणि आरोप समोर येत आहेत. संबंधित सर्व बाबींची चौकशी करून सत्य समोर आणले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.