Congress to make organisational changes : सृजन अभियान धडकले महाराष्ट्रात, थेट बूथ स्तरावर सर्जिकल स्ट्राईक,
Nagpur आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले जात असताना, काँग्रेस पक्षाने आता थेट बूथ स्तरावर सर्जिकल स्ट्राईक करण्याची तयारी सुरू केली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हाती घेतलेले संघटन सृजन अभियान आता महाराष्ट्रात धडकले असून, या माध्यमातून पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले जाणार आहेत. यामुळे अनेक बनचुक्या तसेच घराणेशाही चालवणाऱ्या प्रस्थापित नेत्यांना धक्का बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाराष्ट्रातील या अभियानासाठी ३७ केंद्रीय निरीक्षकांसह राज्यातील दिग्गजांची फौज मैदानात उतरवली आहे. यामध्ये बाळासाहेब थोरात, नाना पटोले, सतेज पाटील, माणिकराव ठाकरे, नसीम खान, अमित देशमुख, यशोमती ठाकूर आणि डॉ. नितीन राऊत यांसारख्या १८३ नेत्यांचा समावेश आहे. हे नेते केवळ एसी केबिनमध्ये बसून नाही, तर थेट जिल्ह्या-जिल्ह्यात जाऊन कार्यकर्त्यांच्या नाडीवर हात ठेवणार आहेत.
Encroachment regularisation : २०११ पूर्वीची अतिक्रमणे नियमित, एका कुटुंबाला एकच लाभ
या अभियानाचा सर्वात मोठा फटका पक्षातील सुस्त पदाधिकाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. बूथपासून ते राज्य स्तरापर्यंत पारदर्शक नियुक्त्या केल्या जाणार असून, ज्यांच्याकडे कर्तृत्व आहे त्यांनाच संधी दिली जाणार आहे.
महिला आणि तरुणांच्या रक्ताला संघटनेत स्थान देणे, जबाबदाऱ्यांचे पारदर्शक वाटप करून गटातटाचे राजकारण संपवणे, समर्पित कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणून कॅडर बेस मजबूत करणे हे या मोहिमेचे उद्धिष्ट्य आहे. सत्ताधारी पक्षाच्या तगड्या निवडणूक यंत्रणेला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने हे सृजन अस्त्र बाहेर काढले आहे. जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांपासून ते बूथ कमिटीच्या रचनेपर्यंत थेट दिल्लीची नजर असणार आहे.
Ajit pawar plane crash : अजित पवार विमान अपघात प्रकरणाला नवे वळण
त्यामुळे स्थानिक पातळीवर आपला माणूस बसवणाऱ्या नेत्यांना आता चाप बसणार असून, केवळ मेरिटवरच पदे मिळतील, अशी माहिती प्रदेश काँग्रेस कमिटीने दिली आहे. काँग्रेसच्या या हायटेक आणि लोकाभिमुख अभियानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आता या सृजन अभियानातून खरोखरच नवा सृजनशील काँग्रेस पक्ष उभा राहतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.








