Sunetra pawar : कोट्यवधींच्या विकासकामांना हिरवा कंदील?, उपमुख्यमंत्र्यांचा शब्द

dcm sunetra pawar assures for development fund fordeulgao raja : देऊळगाव राजाच्या विकासाला गती; सुनेत्रा पवार यांचे निधीचे आश्वासन

Deulgao raja आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर देऊळगाव राजाच्या विकासासाठी राज्य पातळीवर हालचालींना वेग आला आहे. शहरातील विविध विकासकामांसाठी निधीची मागणी करत नगरपरिषद सत्तारूढ गटाने मुंबईत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली असता, “शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही,” असे ठाम आश्वासन त्यांनी दिले.

नगर परिषद निवडणुकीत शहरवासीयांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत सत्ता दिल्यानंतर, आमदार मनोज कायंदे यांच्या पुढाकारातून शहरात विकासकामांना गती मिळत असल्याचे चित्र आहे. मात्र, प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी मोठ्या निधीची गरज असल्याने सत्तारूढ गटाने थेट राज्य नेतृत्वाकडे धाव घेतली.

Sushant dalvi : कणकवलीत बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांचा संशयास्पद मृत्यू

२४ मार्च रोजी मुंबई येथे झालेल्या या बैठकीत पालकमंत्री मकरंद पाटील यांच्यासह विविध विकास योजनांवर सविस्तर चर्चा झाली. यात भुयारी गटार योजना, शहरातील पाणीपुरवठा वितरण व्यवस्था, रस्ते व नाल्यांची कामे, तसेच सुसज्ज सांस्कृतिक भवन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आणि अभ्यासिकेसाठी निधीची मागणी करण्यात आली.

राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे म्हणजे, या बैठकीत पूर्वीच्या प्रचारावेळी अजित पवार यांनी दिलेल्या आश्वासनांची आठवण करून देण्यात आली. त्यावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी “दादांचा शब्द वाया जाऊ देणार नाही,” असे स्पष्ट करत निधी उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेतली.

Ashok kharat case : अशोक खरात प्रकरणाला नवे वळण; एसआयटी तपासात धक्कादायक बाबी उघड

देऊळगाव राजा नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप युतीची सत्ता असून, विकासाच्या मुद्द्यावर दोन्ही पक्ष एकत्र येत असल्याचे या भेटीतून दिसून आले. यामुळे स्थानिक राजकारणात विकास हा केंद्रबिंदू ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.

दरम्यान, आमदार मनोज कायंदे यांनी आतापर्यंत शहरासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणण्यात यश मिळवले असल्याचा दावा सत्तारूढ गटाकडून करण्यात येत आहे. ‘मिशन विकास’च्या माध्यमातून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.

Ravi Rana : अमरावती पोलिसांबद्दल काही आमदारांची नाराजी, रवी राणांकडून मात्र कौतुक

एकंदरीत, देऊळगाव राजाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून मिळालेले हे आश्वासन राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विकासाच्या मुद्द्यावर मतदारांना आकर्षित करण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.