Nagpur Municipal Corporation : बैठकीच्या नोटीसवर विरोधीपक्षनेत्याचे नाव पेनाने लिहीले, सत्ताधारी भाजपचा खोडसाळपणा

NMC review meeting will be held at Nitin Gadkari residence on sunday 29 march : आढावा बैठक आता गडकरींच्या निवासस्थानी; विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष

Nagpur उपराजधानीतील विकास प्रकल्प आणि रखडलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या महापालिकेच्या बैठकीला आता राजकीय संघर्षाचे वळण लागले आहे. महापालिका मुख्यालयात होणारी ही महत्त्वाची बैठक आता गडकरींच्या निवासस्थानी होणार आहे. या बदललेल्या ठिकाणामुळे महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते व विरोधी पक्षनेते तसेच काँग्रेसचे आमदार या बैठकीला जाणार की बहिष्कार टाकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सुरुवातीला ही बैठक रविवारी (ता. २९) महापालिका मुख्यालयात नियोजित होती. प्रशासनाने महापौर, उपमहापौर आणि सर्व आमदारांना निमंत्रणे धाडली, पण जाणीवपूर्वक विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर यांचे नाव वगळण्यात आले. हा प्रकार लक्षात येताच महाकाळकर यांनी प्रशासनाला धारेवर धरले. अखेर प्रशासनाने चूक मान्य केली खरी, पण निमंत्रण पत्रिकेवर सर्वात शेवटी पेनाने नाव लिहून त्यांना निमंत्रण धाडण्यात आले.

 

High court : थेट हायकोर्टाला पत्र पाठवणे याचिकाकर्त्याला पडले महाग; न्यायमूर्तींनी सुनावले

 

 

नितीन गडकरी हे पक्षभेदापलीकडे जाऊन विकासकामे करण्यासाठी ओळखले जातात. संसदेत सोनिया गांधींनीही ज्यांच्या कामाची स्तुती केली, अशा नेत्याच्या नावाखाली महापालिकेतील भाजपचे स्थानिक पदाधिकारी विरोधकांना डावलण्याचे राजकारण करत असल्याची चर्चा आहे. महाकाळकर यांचे नाव वगळण्याचा आदेश गडकरींकडून येणे अशक्य असले तरी, पालिकेतील सत्ताधारी भाजप नेत्यांनीच हा खोडसाळपणा केल्याचा संशय व्यक्त होत आहे.

नागपूर महापालिकेत १०२ नगरसेवकांसह भाजपचे निर्विवाद वर्चस्व आहे. या एकतर्फी सत्तेच्या जोरावर सत्ताधारी आणि महापालिका प्रशासन घटनात्मक असलेल्या विरोधी पक्ष पदाचा वारंवार विसर पडल्याचे दाखवत आहेत. ३७ नगरसेवकांचे संख्याबळ असलेल्या विरोधकांना प्रशासकीय प्रक्रियेतून बाहेर ठेवणे, हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असल्याची टीका होत आहे.

Ashok kharat case : खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे 100 तक्रारी, त्यात 70 टक्के महिलांच्या!

संख्याबळ कमी असले तरी गेल्या काही दिवसांत काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्थायी समितीतील वादग्रस्त कंत्राट रोखण्यापासून ते झोन सभापती निवडणुकीतील सत्ताधाऱ्यांचे मनसुबे उधळण्यापर्यंत विरोधकांनी भाजपला जेरीस आणले आहे. याच धसक्यातून आता बैठकीचे स्थळ बदलून विरोधकांची कोंडी करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे.