व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Accident of congress leader : काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात, पर्यवेक्षिका संगीता...

Accident of congress leader : काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात, पर्यवेक्षिका संगीता बेनिवाल थोडक्यात बचावल्या

accident involving the vehicle of Congress office-bearers; Supervisor Sangeeta Beniwal narrowly escaped : तुमसरची बैठक आटोपून नागपूरला येताना घडली घटना, जीवितहानी टळली

Nagpur नागपूर-तुमसर मार्गावरील खापा चौकात काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात काँग्रेसच्या राजस्थानमधील पर्यवेक्षिका संगिता बेनिवाल आणि नागपूरच्या नेत्या कुंदा राऊत या बालंबाल बचावल्या असून, कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील काँग्रेस नेत्या आणि पक्षाच्या पर्यवेक्षिका संगिता बेनिवाल या तुमसर येथे आयोजित एका महत्त्वपूर्ण बैठकीसाठी आल्या होत्या. बैठक आटोपून त्या आपल्या इनोव्हा कारने नागपूरच्या दिशेने रवाना झाल्या. त्यांचे वाहन खापा चौकात आले असता, समोरून गोंदियाच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव ब्रेझा कारने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.

Youth congress : निवडणुकांना पूर्णविराम! महाराष्ट्र युवक काँग्रेसची १२६ जणांची ‘महाजम्बो’ कार्यकारिणी जाहीर

हा अपघात इतका भीषण होता की, संगिता बेनिवाल यांच्या इनोव्हा गाडीचे दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताच्या वेळी गाडीमध्ये नागपुरातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्या कुंदा राऊत या देखील उपस्थित होत्या. सुदैवाने, गाडीतील एअरबॅग्ज आणि वेळेवर मिळालेल्या सुरक्षिततेमुळे दोन्ही नेत्यांना गंभीर दुखापत झाली नाही.

Oracle company: १२ हजार भारतीयांना नोकरीवरून काढलं, पहाटे पाच वाजता पाठवला ईमेल

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. या घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. दोन्ही नेत्यांची प्रकृती स्थिर असून, केवळ वाहनांचे आर्थिक नुकसान झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून दोन्ही बाजूंच्या चालकांची चौकशी केली जात आहे.

error: Content is protected !!