Ex-mp Navneer rana attacked Uddhav Thackeray on Hanuman Chalisa issue : नवनीत राणांचा बोचरा वार, राऊतांकडे फक्त भांडण लावण्याचे काम
Amravati हनुमान चालीसा पठणावरून गाजलेल्या जुन्या संघर्षाच्या आठवणींना उजाळा देत माजी खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. मुख्यमंत्री असताना ठाकरेंनी हनुमान चालीसा पठणाला विरोध केला, त्याचे फळ त्यांनी भोगले आहे. एका झटक्यात चाळीस आमदार सोडून गेले. आता त्यांच्याकडे जे काही मोजके आमदार आणि नेते उरले आहेत, त्यांना वाचवण्यासाठी ठाकरेंसमोर केवळ हनुमान चालीसा पठण हाच शेवटचा पर्याय उरला आहे, अशा बोचऱ्या शब्दांत राणा यांनी ठाकरेंना टोला लगावला.
संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना नवनीत राणा म्हणाल्या की, “सकाळपासून ज्यांचा भोंगा सुरू होतो, त्या राऊत नावाच्या पोपटाकडे केवळ दोन लोकांमध्ये भांडणे लावण्याचेच काम उरले आहे. भाजपमध्ये कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला नाही, हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. त्यामुळे राऊत यांनी काळजी करण्याची गरज नाही.’
Amravati Municipal Corporation : ‘आमचा पराभव जनतेने नाही, नवनीत राणांनी केला’;
अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा भोंदूबाबा अशोक खरात याच्यावरही नवनीत राणा यांनी संताप व्यक्त केला. अशा भोंदूबाबांनी खाजगी व्हिडिओ व्हायरल करून अनेक संसार मोडले आहेत. महिलांचे शोषण करणाऱ्या या बलात्कारी नराधमाला भरचौकात फाशीच दिली पाहिजे. तरच भविष्यात कोणाची अशी हिंमत होणार नाही. पोलिसांनी त्याचा कडक समाचार घ्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
Death Threat to Former MP Navneet Rana : एक आठवड्यानंतर पोलीस रिकाम्या हाताने परतले
निवडणुकीत संधी न मिळाल्याने नाराज असल्याच्या चर्चांवरही त्यांनी स्पष्टीकरण दिले. मी कोणत्याही कारणास्तव नाराज नाही. माझ्या सोशल मीडिया स्टेटसचा संबंध प्रत्येक वेळी राजकारणाशी जोडणे चुकीचे आहे. माझा पिंड राजकारणाचा नाही. जीवनात अनेक गोष्टी व घडामोडी घडत असतात. त्यावेळच्या परिस्थितीनुसार मी स्टेटस ठेवत असते. त्याच्या बातम्या होतात. राजकीय चर्चा होते. मात्र यात काही तथ्य नसल्याचेही नवनित राणा यांनी पत्रकारांसोबत बोलताना सांगितले








