व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण NCP Sharad Pawar: नागपुरात राष्ट्रवादीचे ‘कुंटे’ सुटणार? नव्या जिल्हाध्यक्षासाठी ‘तुतारी’ची आरोळी

NCP Sharad Pawar: नागपुरात राष्ट्रवादीचे ‘कुंटे’ सुटणार? नव्या जिल्हाध्यक्षासाठी ‘तुतारी’ची आरोळी

NCP Sharad Pawar party looking for new district president : शरद पवारांच्या पक्षापुढे नवे आव्हान, सलील देशमुखांचे नाव आघाडीवर

Nagpur शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नागपूर जिल्ह्याच्या नेतृत्वात मोठ्या फेरबदलाचे संकेत मिळत आहेत. विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी पदावरून मुक्त करण्याची मागणी केल्याने नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे. या शर्यतीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख यांचे नाव सर्वात आघाडीवर असून कार्यकर्त्यांकडून त्यांच्या नावाचा जोरदार आग्रह धरला जात आहे.

मुंबईत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, जयंत पाटील आणि अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत कुंटे पाटील यांनी ‘ब्रेक’ घेण्याची इच्छा व्यक्त केली. मागील २५ वर्षांपासून सक्रीय असलेल्या कुंटे यांनी नव्या रक्ताला संधी देण्याची विनंती केली असली, तरी त्यामागे पक्षीय पातळीवर अपेक्षित आर्थिक रसद मिळत नसल्याची खदखद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दुसरीकडे, माजी मंत्री रमेश बंग यांनीही आपल्या पुत्रासाठी फिल्डिंग लावली असून घराणेशाहीच्या या वादात अविनाश गोतमारे यांचे नाव ‘डार्क हॉर्स’ ठरू शकते.

प्रदेश सरचिटणीस आणि चंद्रपूरचे निरीक्षक असलेल्या गोतमारे यांचे नाव यापूर्वी चर्चेत होते. त्यावेळी दोन्ही राष्ट्रवादीमध्ये फाटाफूट झाली होती. अनेकांचा कल अजितदादा यांच्याकडे होते. हे बघता संभाव्य पडझड रोखण्यासाठी त्यांच्या नावाचा विचार होऊ शकला नाही. एका बड्या नेत्याने त्यांच्या नावाला विरोध केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा कुंटे पाटील यांच्याकडे जबाबदारी सोवण्यात आली होती. आता मात्र परिस्थिती निवळली आहे.

Chandrapur Municipal Corporation : चंद्रपूर महानगरपालिकेत नगरसेवकांचे बंडाचे रणशिंग! अंतर्गत कलहाचा अदृश्य सूत्रधार कोण?

त्यावेळी सलील देशमुख यांना विधानसभा लढवायची असल्याने त्यांनी यापूर्वी अध्यक्षपद नाकारले होते. मात्र, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आटोपल्या असल्याने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता आहे.

Akola civil line police : शरिरसुखाची मागणी करणारा पोलिस निरीक्षक न्यायालयीन कोठडीत

विशेष म्हणजे, अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुरावा कमी होत असून, भविष्यात दोन्ही गट एकत्र आल्यास नागपूर जिल्ह्याची सूत्रे पूर्णतः अनिल देशमुख यांच्या गटाकडेच राहतील, असे चित्र सध्या दिसत आहे. कुंटे पाटील यांनी जरी पक्ष सोडणार नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी त्यांचा हा ‘ब्रेक’ नेमका कशासाठी, याचे गूढ कायम आहे. आता शरद पवार आणि जयंत पाटील कुणाच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ घालतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्यंतरी युवा नेते आमदार रोहित यांनी अनुभवी व ज्येष्ठ नेत्यांनी सल्लागाराची भूमिका बजावावी आणि रस्त्यावर उतरून लढा देणाऱ्यांना संधी द्यावी अशी मागणी केली होती. हे बघता लढवय्या युवा नेत्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाईल असा तर्क व्यक्त केला जात आहे.

error: Content is protected !!