Eknath Shinde shivsena geared up for 2029 election : शिवसैनिकांच्या प्रशिक्षण शिबिरातून संकेत, एसआयआर प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष ठेवणार
Nagpur एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीतून भाजपमार्फत शिंदे यांची शिवसेना संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दावे विरोधकांकडून केले जात असतानाच, शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अधिकाधिक जागांवर मोर्चेबांधणी सुरू केली आहे. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या प्रशिक्षण शिबिरातून तसे संकेत देण्यात आले आहेत.
येत्या निवडणुकीपूर्वी सर्वच मतदारसंघांची पुनर्रचना होणार आहे, त्यामुळे मतदारसंघांची संख्याही वाढणार आहे. नागपूरसह विदर्भात भाजपसोबत जागावाटप करताना ‘बार्गेनिंग’ करता यावी, यासाठी पक्षाला सक्रिय केले जात आहे. याच शिबिरात शिवसैनिकांना मतदार याद्यांच्या सुधारणेच्या (एसआयआर) प्रक्रियेकडे बारकाईने लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.प्रशिक्षण शिबिरासाठी पूर्व विदर्भाचे संपर्क प्रमुख व माजी मंत्री दीपक सावंत, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल येथे आले आहेत.
Nana patole: महाराष्ट्रात आठ दिवसांत मोठा राजकीय भूकंप होणार; नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
आमदार कृपाल तुमाने, पूर्व विदर्भाचे संघटक किरण पांडव हेसुद्धा शिवसैनिकांना ‘बूस्टर डोस’ देणार आहेत. वसंतराव देशपांडे सभागृहात दाखल होण्यापूर्वी दीपक सावंत यांनी “आम्हाला आमची संघटना मजबूत करण्याचे पूर्ण अधिकार आहेत, असे स्पष्ट केले. लोकसभेच्या निवडणुकीला आणखी तीन वर्षांचा कालावधी शिल्लक आहे. २०२९ पूर्वी मतदारसंघांची पुनर्रचना होणार असून विदर्भातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांमध्ये वाढ होणार आहे. हे सर्व लक्षात घेऊन आम्ही आमच्या पक्षाची आखणी करणार आहोत आणि संघटन बांधणी अधिक मजबूत करणार आहोत.
यात भाजप किंवा इतर पक्षांसोबत स्पर्धा करण्याचा प्रश्न येत नाही, कारण सर्वच पक्ष आपापल्या परीने तयारी करत असतात. आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार हे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असल्याचे दीपक सावंत यांनी सांगितले.आमदार कृपाल तुमाने यांनीसुद्धा हा मेळावा नसून प्रशिक्षण शिबिर असल्याचे स्पष्ट केले. यात मोजक्याच पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. आगामी लोकसभेला सामोरे जाण्यापूर्वी मतदार याद्या कशा पद्धतीने तयार केल्या जात आहेत आणि बोगस लोकांची नावे वगळण्यात येत आहेत का, याकडे सर्वांना लक्ष द्यावे लागणार आहे.
Sudhir Mungatiwar : चंद्रपूर बदलतोय वेगाने; मुनगंटीवारांच्या नेतृत्वात विकासाची नवी कहाणी
एसआयआरमध्ये अनेक नावे वगळली जात असल्याच्या तक्रारी आहेत, त्यामुळे आपले मतदार याद्यांमध्ये कायम राहावेत यासाठी शिवसैनिकांना लक्ष द्यावे लागणार आहे. पूर्व विदर्भाचे संघटक किरण पांडव यांनीसुद्धा आम्ही आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहोत, असे माध्यमांशी बोलताना सांगितले.सध्या उद्धव आणि शिंदे अशा दोन गटांत शिवसैनिक विखुरले गेल्यामुळे विदर्भात दोन्ही सेना कमकुवत झाल्याचे दिसून येत आहे.
नागपूर जिल्ह्यातील बारापैकी केवळ रामटेक हा एकच विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडण्यात आला होता. रामटेक आणि भंडारा या दोन मतदारसंघांत शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसुद्धा महायुती असताना शिवसेनेला स्वबळावर लढाव्या लागल्या आहेत. विदर्भातील भाजपचा जोर पाहता, शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये स्वतंत्र वाट चोखाळावी लागणार असल्याचे दिसून येते.








