BJP gears up for elections through the Mahaprashikshan Abhiyan : कार्यकर्त्यांना दिला सज्ज राहण्याचा सल्ला, संघटन बळकट करण्यावर भर
Motala भारतीय जनता पक्षाच्या वतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय महाप्रशिक्षण अभियानाला मोताळा तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धामणगाव बढे आणि मोताळा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हे महाप्रशिक्षण शिबिर रविवारी (५ एप्रिल) स्वामी समर्थ मंगल कार्यालय, मोताळा येथे उत्साहात पार पडले. शिबिराचे उद्घाटन भाजपा जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.या शिबीराच्या माध्यमातून भाजपने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
या शिबीरात विजयराज शिंदे यांनी महाप्रशिक्षण अभियान हे केवळ औपचारिक शिबिर नसून कार्यकर्त्यांना वैचारिकदृष्ट्या सक्षम, संघटनात्मकदृष्ट्या मजबूत आणि निवडणूकदृष्ट्या सज्ज बनविणारे प्रभावी माध्यम आहे, असे सांगितले. पक्षाची विचारधारा, केंद्र व राज्य सरकारच्या योजना, तसेच जनतेपर्यंत पोहोचवायच्या विकासकामांची माहिती प्रत्येक कार्यकर्त्याने गावपातळीवर प्रभावीपणे नेण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
“प्रत्येक बूथ, प्रत्येक गाव आणि प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाच्या विजयाचा केंद्रबिंदू आहे,” असे स्पष्ट करीत त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनी जनसंपर्क वाढवून सरकारच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा, असा संदेशही त्यांनी दिला.
Nana patole: महाराष्ट्रात आठ दिवसांत मोठा राजकीय भूकंप होणार; नाना पटोलेंचा खळबळजनक दावा
या प्रशिक्षण शिबिरात भाजपा पदाधिकाऱ्यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करत संघटन विस्तार, बूथ व्यवस्थापन, सोशल मीडिया समन्वय, जनसंपर्क, निवडणूक नियोजन आणि पक्षनिष्ठा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर भूमिका मांडली. त्यामुळे आगामी राजकीय लढतींसाठी कार्यकर्त्यांना स्पष्ट दिशा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.








