व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Akola congress : विद्यमान अध्यक्षांवर नाराजी, अकोल्यात काँग्रेसला मिळणार नवीन नेतृत्व?

Akola congress : विद्यमान अध्यक्षांवर नाराजी, अकोल्यात काँग्रेसला मिळणार नवीन नेतृत्व?

congress may get new presidents in akola district and mahanagar soon : संघटनेत मोठ्या बदलांची शक्यता; निरीक्षकांकडून जिल्हानिहाय आढावा

Akola काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर व महानगराध्यक्ष प्रशांत वानखडे यांच्याबाबत पक्ष संघटनेत नाराजी असल्याने अनेकदा जिल्ह्यातील नेतृत्वात बदल करण्याची मागणी पक्षातून झाली आहे. या मागणीबाबत प्रदेश काँग्रेसकडून गांभीर्याने विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे. असे झाल्यास जिल्हा व महानगर कार्यकारीणीतही काही बदल होण्याची शक्यता व्रतविण्यात आली आहे.

नगरपालिका आणि महापालिका निवडणुकांतील पराभवानंतर काँग्रेस पक्षाने ‘संघटन सृजन अभियान’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील पक्ष संघटनेत मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या अभियानांतर्गत काँग्रेसकडून नियुक्त निरीक्षक संबंधित जिल्ह्यांमध्ये भेट देऊन स्थानिक परिस्थितीचा सखोल आढावा घेणार आहेत. ते पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध घटकांशी संवाद साधून संघटनेत आवश्यक बदलांविषयी अहवाल तयार करणार आहेत.

Minimum Support Price (MSP) scheme : आधारभूत किंमत योजनेत मका विकला, तीन महिन्यांपासून पैशांचा पत्ता नाही

या संदर्भातील बैठकीला प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. बैठकीत राज्यातील नुकत्याच झालेल्या महापालिका व नगरपालिका निवडणुकांतील अपयशाचा आढावा घेण्यात आला. पराभवानंतर काँग्रेसने संघटन बळकटीसाठी हा उपक्रम हाती घेतला असला, तरी या अभियानातून प्रत्यक्षात कितपत बदल घडतील, याबाबत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्सुकता आहे. ‘संघटन सृजन अभियान’ प्रभावी ठरेल की केवळ औपचारिक उपक्रम ठरेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!