व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Israel lebanon attack : इस्रायलचे लेबनॉनवर भीषण हवाई हल्ले, २५४ नागरिकांचा मृत्यू

Israel lebanon attack : इस्रायलचे लेबनॉनवर भीषण हवाई हल्ले, २५४ नागरिकांचा मृत्यू

israel-lebanon-attack-ceasefire-day1-hormuz-strait-closed-tension-rise : शस्त्रसंधीच्या पहिल्याच दिवशी तणाव शिगेला, होर्मुझ सामुद्रधुनी बंद

New Delhi : अमेरिका आणि इराण यांच्यात जाहीर झालेल्या युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम आशियातील तणाव कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असतानाच इस्रायलने आक्रमक भूमिका कायम ठेवत लेबनॉनवर जोरदार हवाई हल्ल्यांची मालिका सुरूच ठेवली आहे. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत २५४ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून ११६५ हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. लेबनॉनची राजधानी बैरूत येथे दिवसभर स्फोट आणि हवाई हल्ल्यांचे आवाज घुमत राहिल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनांमुळे युद्धविरामाच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, अमेरिका आणि इराणसोबत शस्त्रसंधी झाली असली तरी हिजबुल्लाहविरोधातील कारवाई सुरूच राहणार आहे. गरज भासल्यास पुन्हा पूर्ण क्षमतेने युद्ध सुरू करण्यास इस्रायल तयार असल्याचेही त्यांनी नमूद केले. अजून अनेक लष्करी उद्दिष्टे पूर्ण करायची असल्याचे सांगत इस्रायल आपली मोहीम थांबवणार नसल्याचा ठाम इशाराही त्यांनी दिला.

Indecent acts with a female student : धक्कादायक! सेवानिवृत्तीला आलेल्या शिक्षकाचे विद्यार्थिनीबरोबर अश्लील चाळे

दरम्यान, इस्रायलच्या कारवाईमुळे इराणने तीव्र नाराजी व्यक्त केली असून लेबनॉनवरील हल्ले थांबवले नाहीत तर प्रतिहल्ला करण्याचा इशारा दिला आहे. तसेच, लेबनॉनमध्ये स्थिर युद्धविराम झाल्याशिवाय पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे होणाऱ्या चर्चेत सहभागी होणार नसल्याची भूमिकाही इराणने स्पष्ट केली आहे. इराणच्या हवाई क्षेत्रात परवानगीशिवाय प्रवेश करणाऱ्या कोणत्याही देशाच्या विमानांना युद्धविरामाचे उल्लंघन मानले जाईल, असा कठोर इशाराही देण्यात आला आहे.

या सर्व तणावपूर्ण घडामोडींमध्ये आणखी एक मोठी घटना घडली असून इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील जहाज वाहतूक रोखण्याचा निर्णय घेतला आहे. या सामुद्रधुनीतून जगातील मोठ्या प्रमाणावर तेल वाहतूक होत असल्याने या निर्णयाचा जागतिक तेलपुरवठ्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इराणच्या नौदलाने स्पष्ट केले आहे की, परवानगीशिवाय कोणतेही जहाज सामुद्रधुनी पार करण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर कठोर कारवाई केली जाईल.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकाराने जाहीर करण्यात आलेल्या दोन आठवड्यांच्या युद्धविरामाला आधीच धक्का बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांनी हा करार अत्यंत नाजूक असल्याचे म्हटले असून परिस्थिती कोणत्याही क्षणी चिघळू शकते, अशी शक्यता व्यक्त केली आहे.

Royalty waiver : उत्खनन रॉयल्टी माफी आणि बिनशेती प्रक्रिया डिजिटल

शस्त्रसंधी जाहीर झाल्यानंतर काही तासांतच नव्या हल्ल्यांच्या बातम्या समोर आल्यामुळे पश्चिम आशियात पुन्हा व्यापक युद्ध भडकण्याची भीती निर्माण झाली आहे. इस्रायल, इराण आणि लेबनॉन यांच्यातील वाढता संघर्ष जागतिक पातळीवर चिंतेचा विषय ठरत असून पुढील काही दिवसांमध्ये परिस्थिती कोणत्या दिशेने जाईल याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!