व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Balwant Wankhede : खूप झाल्या बैठका, आता कामाला लागा, खासदाराचा अल्टीमेटम

Balwant Wankhede : खूप झाल्या बैठका, आता कामाला लागा, खासदाराचा अल्टीमेटम

MP Balwant Wankhede directed administrations to solve water shortage crisis : पाणीटंचाईवरून अधिकाऱ्यांची झाडाझडती, तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश

Amravati धारणी तालुक्यात तीव्र होत चाललेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या संथ कारभाराबाबत जनप्रतिनिधींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. “आता बैठका नकोत, प्रत्यक्ष काम दिसले पाहिजे,” असा स्पष्ट इशारा खासदार बळवंत वानखडे यांनी दिला.

धारणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, महावितरणचे कर्मचारी, ग्रामसेवक, सरपंच-उपसरपंच तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ashok kharat case : १६० जीबी डिजिटल पुरावे, प्रत्येकाला कोडवर्ड, फॉरेन्सिक अहवाल सादर

 

बैठकीत उपस्थितांनी आपल्या-आपल्या भागातील पाणीटंचाईशी संबंधित समस्या मांडल्या. यावर खासदार वानखडे यांनी कडक भूमिका घेत, “जनतेला पाणी वेळेवर मिळालेच पाहिजे. पुढील बैठकीत कारणे नकोत, तर काम पूर्ण झाल्याचा अहवाल हवा,” अशा शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावले. तसेच, ज्या भागांत पाणीटंचाई गंभीर आहे, तेथे तात्काळ कामे सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. ग्रामीण भागातील पाणी समस्येवर प्राधान्याने उपाययोजना राबवण्याचे आदेश देत, मदतकार्याला गती देण्याचेही त्यांनी आश्वासन दिले.

District Bank elections : आजोबा, वडील आणि आता नातू… जिल्हा बँकेवर घराणेशाहीची मोहोर!

दरम्यान, अनेक गावांमध्ये भीषण पाणीटंचाई असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली असून, प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!