Opposition to attack the government over the demand for ‘Satbara Kora’. : ‘सातबारा कोरा’च्या मागणीवरून विरोधक सरकारला घेरणार, विमा कंपन्यांनच्या लाभावर ठेवले बोट
Nagpur महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली असली, तरी विरोधकांनी आता या मुद्द्यावरून सरकारची कोंडी करण्याची तयारी केली आहे. केवळ दोन लाखांची माफी देऊन चालणार नाही, तर शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा करा,अशी मागणी करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
माध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा पूर्णपणे कोरा होत नाही, तोपर्यंत त्यांना कर्जाच्या विळख्यातून खरी मुक्ती मिळणार नाही. सरकारने जाहीर केलेली दोन लाखांची कर्जमाफी ही निव्वळ बनवाबनवीअसून सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. या योजनेनंतरही शेतकऱ्यांच्या डोक्यावर उर्वरित कर्जाचा डोंगर कायम राहणार असल्याने, त्यांना भविष्यात बँकांकडून नवीन पीककर्ज मिळणे कठीण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
Water shortage : दुसरबीडमध्ये पाणी पेटले! गटारी व रस्त्यांच्या प्रश्नावर ग्रामस्थ आक्रमक
पीकविमा योजनेवर ताशेरे ओढताना वडेट्टीवार म्हणाले की, या योजनेतून केवळ विमा कंपन्या गब्बर होत आहेत. प्रत्यक्षात संकटात असलेला शेतकरी आजही मदतीपासून वंचित आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत त्यांनी सांगितले की, सरकारने वर्षभर शेतकऱ्यांना ताटकळत ठेवले. माजी आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनानंतर सरकारला जाग आली आणि आता कुठे दोन लाखांची घोषणा झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जूनपासून ही रक्कम खात्यात जमा होईल असे सांगितले असले, तरी पूर्ण कर्जमाफीशिवाय शेतकरी सुखी होणार नाही, असा पवित्रा विरोधकांनी घेतला आह.
Buldhana Politics : सत्काराच्या आड नवे समीकरण? बुलढाणा–चिखलीत ‘पॉलिटिकल सेटिंग’!
राज्यातील सद्यस्थितीवर भाष्य करताना वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या फोडाफोडीला ऊत आला असून नीतिमत्ता नावाचा प्रकार उरलेला नाही. कोणाला तरी आधी डोक्यावर घ्यायचे आणि नंतर पायाखाली तुडवायचे, ही आता फॅशन झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला. महायुती सरकारमध्ये सर्व काही आलबेल नसून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री अस्वस्थ असल्याचा दावाही त्यांनी केला. मुंबई महानगरपालिकेतील नगरसेवक निधी वाटपाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. राजकारण हे केवळ निवडणुकीपुरते असावे. विकास निधी देताना सर्वांना समान न्याय मिळणे अपेक्षित आहे. मात्र, सध्याचे सरकार विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना निधी नाकारून लोकशाहीसाठी घातक पायंडा पाडत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.








