iran-us-peace-talks-fail-islamabad-jd-vance-warning-tensions-rise : जे.डी. व्हान्स यांचे इशारे, पुढील काही तासांत मोठे निर्णय शक्य
New Delhi: इस्लामाबादमध्ये तब्बल २१ तास चाललेल्या अमेरिका आणि इराण यांच्यातील महत्त्वपूर्ण शांती चर्चेचा कोणताही ठोस निष्कर्ष निघाला नाही आणि ही वार्ता अखेर निष्फळ ठरल्याने जागतिक पातळीवर तणाव अधिकच वाढला आहे. या चर्चेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते, मात्र दोन्ही देशांमध्ये कोणताही करार न झाल्याने संभाव्य संघर्षाची भीती पुन्हा निर्माण झाली आहे.
अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांनी इस्लामाबादमध्ये माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, अमेरिका प्रामाणिक हेतूने चर्चेसाठी आली होती, परंतु इराणने अमेरिकेच्या अटी स्वीकारण्यास नकार दिला. त्यांनी सांगितले की, चर्चा सकारात्मक वातावरणात झाली, अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर संवाद झाला, परंतु अंतिम निर्णयापर्यंत पोहोचता आले नाही. करार न होणे ही परिस्थिती अमेरिकेसाठी जितकी चिंताजनक आहे, त्यापेक्षा अधिक ती इराणसाठी गंभीर ठरू शकते, असा इशाराही त्यांनी दिला.
Mla land issue : आमदाराच्या मालकीमुळे जिन्याचे काम रखडले, शिंदे सेनेच्या मंत्र्यांची थेट भूमिका !
व्हान्स यांनी पाकिस्तानच्या भूमिकेचे कौतुक करताना म्हटले की, पाकिस्तानने मध्यस्थ म्हणून उत्कृष्ट काम केले आणि दोन्ही देशांमधील मतभेद कमी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. तरीही मतभेद दूर होऊ शकले नाहीत. या बैठकीनंतर अमेरिकेचे प्रतिनिधीमंडळ करार न करता परतले आहे.
दरम्यान, या चर्चेच्या अपयशानंतर पर्शियन आखातातील परिस्थिती अधिकच गंभीर बनण्याची चिन्हे दिसत आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीत इराणने पेरलेले जलसुरंग हटवण्यासाठी अमेरिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. अमेरिकेच्या नौदलातील सुरुंगविरोधी तज्ञ युद्धनौका या मोहिमेत कार्यरत असून जागतिक समुद्री व्यापारासाठी महत्त्वाचा असलेला हा मार्ग सुरक्षित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमेरिकेच्या केंद्रीय कमांडचे प्रमुख ॲडमिरल ब्रॅड कूपर यांनी या कारवाईची पुष्टी केली आहे.
Sonali hinge : पुणे पोलिस दलात खळबळ; ‘रील स्टार’ सोनाली हिंगेसह तीन पोलिसांचे निलंबन
या सर्व घडामोडींमुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः अमेरिकेकडून कठोर पावले उचलली जाण्याची शक्यता वर्तवली जात असून पुढील काही तासांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.








