व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Water shortage : जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट; प्रकल्पांतील साठा ३४ टक्क्यांवर

Water shortage : जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट; प्रकल्पांतील साठा ३४ टक्क्यांवर

Rapid decline in water storage casts a shadow of scarcity over Buldhana district : ‘खडकपूर्णा’ तळाला, ‘पेनटाकळी’त झपाट्याने घट; वाढत्या उन्हामुळे फटका

Buldhana जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर जलसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याचे चित्र समोर आले आहे. पाटबंधारे विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, अवघ्या काही दिवसांत पाणीसाठ्यात लक्षणीय घट झाली असून जिल्ह्याची सरासरी पाणीपातळी ३४.०३ टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील प्रमुख प्रकल्पांपैकी खडकपूर्णा प्रकल्प तळाला पोहोचण्याच्या मार्गावर असून, पेनटाकळी प्रकल्पातही अल्पावधीत मोठी घट नोंदवण्यात आली आहे. परिणामी सिंचनासह पिण्याच्या पाण्याच्या नियोजनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्यम आणि लघु प्रकल्पांची स्थितीही समाधानकारक नसल्याने ग्रामीण भागातील पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम दिसू लागला आहे.

मागील वर्षी याच कालावधीत जिल्ह्यात ४१.९८ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा तो केवळ ३४.०३ टक्क्यांवर आला आहे. गेल्या काही वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ही पातळी लक्षणीयरीत्या कमी असल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांचा एकत्रित साठा ९ एप्रिल रोजी ४१.५२ टक्के होता, तो १२ एप्रिलपर्यंत ४१.१० टक्क्यांवर आला आहे.

Congress srujan campaign : ‘गाव तिथे काँग्रेस, वार्ड तिथे काँग्रेस’; काँग्रेसला ‘मिरॅकल’ची आशा!

ज्ञानगंगा प्रकल्पात १९.२८ टक्के, मस प्रकल्पात ३८.९६ टक्के, तर तोरणा प्रकल्पात २३.३२ टक्के साठा शिल्लक आहे. बुलढाणा शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या येळगाव प्रकल्पात ४४.३५ टक्के पाणी उपलब्ध आहे. जिल्ह्यातील ४१ लघु प्रकल्पांमध्ये केवळ ३०.७४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अनेक पाणीपुरवठा योजनांवर परिणाम होत असून, काही ठिकाणी टंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Proposed Delimitation : मतदारसंघाच्या वाढीचा फायदा कुणाला? संभाव्य पुनर्रचनेमुळे बदलणार समीकरण

वाढत्या तापमानामुळे जलाशयांमधील पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यात सिंचनासाठी होणारा वापरही वाढल्याने साठ्यावर ताण निर्माण झाला आहे. पाटबंधारे विभागाने यासंदर्भातील सविस्तर अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला असून, पाण्याचे काटेकोर नियोजन आणि वापरावर निर्बंधांसाठी प्रशासनाकडून लवकरच उपाययोजना होण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!