व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Politics on voters list : मतदार यादीवर महायुतीतच चुरस; शिंदेसेना-भाजपमध्ये ‘मैत्रीपूर्ण स्पर्धा’!

Politics on voters list : मतदार यादीवर महायुतीतच चुरस; शिंदेसेना-भाजपमध्ये ‘मैत्रीपूर्ण स्पर्धा’!

competition for voters list within alliance partys in mahayuti : बुलढाण्यात शिंदेसेनेचे भाजपला खुले आव्हान, मित्रपक्षांचेच एकमेकांवर कुरघोडीचे राजकारण

Buldhana मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या मुद्द्यावर महायुतीमधून कोण पुढे राहणार, याची चुरस लागल्याची चर्चा आहे. आगामी निवडणुका, संभाव्य परिसीमन आणि बदलणारी राजकीय समीकरणे लक्षात घेता मतदार यादी हा आता आता राजकीय रणनीतीचा केंद्रबिंदू बनला आहे. जिल्ह्यात तर महायुतीतील मित्र पक्षांमध्ये वर्चस्वाची लढाईच सुरू आहे. भाजपचे विजयराज शिंदे आणि शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यामध्ये तर आरोप प्रत्यारोपाच्या फैरीत झडत आहेत. तसेच पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम घेवून दोन्ही पक्ष आपआपली ताकद जिल्ह्यात वाढवत असल्याचे चित्र आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडे घेतलेल्या बैठकीत संघटन बळकट करण्यासोबतच परिसीमनानंतरच्या संभाव्य बदलांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. याचवेळी मतदार यादीवर बारकाईने लक्ष ठेवत कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचा ‘सिग्नल’ देण्यात आल्याने जिल्ह्यात शिंदेसेना आक्रमक मोडमध्ये गेल्याचे चित्र दिसत आहे.

MSRTC : एसटीतील १७ अकार्यक्षम अधिकारी अद्याप मोकाट; चौकशी समितीचे काम संथगतीने, अभय कोणाचे?

दुसरीकडे भाजपही या बाबतीत मागे नसल्याचे स्पष्ट होत आहे. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी जिल्हाध्यक्षांच्या बैठकींचा धडाका लावत मतदार यादी पुनरिक्षणावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. नियमित ऑनलाईन बैठका, विविध संघटनात्मक कार्यक्रम आणि पदाधिकाऱ्यांना सातत्याने सक्रिय ठेवण्याची रणनीती राबवली जात असल्याची माहिती समोर येत आहे.

Malkapur APMC : मलकापूर बाजार समितीत शेतकऱ्यांकडून ‘अवैध भाडे’ वसुली; विरोधकांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

एकीकडे शिंदेसेना आधीच मैदानात उतरलेली असताना भाजपनेही त्याच दिशेने वेगाने पावले उचलल्याने ही चुरस केवळ मैत्रीपूर्ण स्पर्धा आहे की महायुतीतील अंतर्गत शर्यत, यावर आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक पातळीवर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदार यादीतील प्रत्येक नावाला निवडणुकीतील संभाव्य ‘गेमचेंजर’ म्हणून पाहिले जात असल्याचे बोलले जात आहे.

error: Content is protected !!