व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Mehkar municipal council : मुख्याधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून मेहकर पालिकेत राजकीय वाद; विरोधकांचा सभेवर...

Mehkar municipal council : मुख्याधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून मेहकर पालिकेत राजकीय वाद; विरोधकांचा सभेवर बहिष्कार

Political row erupts in Mehkar Municipal Council over the CO’s absence; opposition boycotts the meeting : मेहकर नगरपालिकेची सर्वसाधारण सभा ठप्प; काँग्रेस, उबाठा व शिंदे गट आक्रमक

Mehkar मेहकर नगरपालिकेच्या सोमवारी आयोजित सर्वसाधारण सभेला मुख्याधिकारी रामराजे कापरे गैरहजर राहिल्याने काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि शिंदे गटाच्या नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत सभेवर बहिष्कार टाकला. या प्रकारामुळे नगरपालिकेच्या राजकारणात खळबळ उडाली असून शहरात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

१३ एप्रिल २०२६ रोजी मुख्याधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत शहर विकासाशी संबंधित विविध महत्त्वाचे विषय मांडले जाणार होते. शहराच्या दृष्टीने काही निर्णायक ठरतील असे निर्णयही अपेक्षित होते. मात्र, सभेच्या वेळी मुख्याधिकारी रामराजे कापरे उपस्थित नसल्याने विरोधी गटातील नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Maharashtra RTO : रिक्षा परमिटची राज्यभर फेरतपासणी; मराठी न आल्यास परवाना रद्द!

याशिवाय १४ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासंदर्भातील नियोजनावरही चर्चा अपेक्षित होती. या विषयावरही नगरसेवक विशेष उत्सुक होते. मात्र, मुख्याधिकारी अनुपस्थित असल्याने या महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकली नाही.

यामुळे शिवसेना (उबाठा) गटाचे नगराध्यक्ष किशोर गारोळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी, काँग्रेसचे नेते कासम गवळी, उपाध्यक्ष अलिम ताहेर यांच्या गटातील नगरसेवकांनी तसेच शिंदे शिवसेनेचे गटनेते सुरेश वाळूकर यांच्या समर्थक नगरसेवकांनी एकत्रितपणे सभेवर बहिष्कार टाकला.

co-operative society election : पैनगंगा सोसायटीवर महायुतीचा झेंडा; बळीराजा पॅनलने सर्व १३ जागा जिंकल्या

या बहिष्कारामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून नगरपालिकेच्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहर विकासाचे विषय आणि महत्त्वाचे प्रशासकीय निर्णय प्रलंबित राहिल्याने नागरिकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे विरोधी पक्षांसोबत शिंदे गटानेही आक्रमक भूमिका घेतल्याने मेहकरच्या स्थानिक राजकारणात नवीन समीकरणांची चर्चा रंगू लागली आहे.

error: Content is protected !!