व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण co-operative society election : पैनगंगा सोसायटीवर महायुतीचा झेंडा; बळीराजा पॅनलने सर्व १३...

co-operative society election : पैनगंगा सोसायटीवर महायुतीचा झेंडा; बळीराजा पॅनलने सर्व १३ जागा जिंकल्या

Mahayuti captures Painganga Society; Baliraja panel wins all 13 seats : पाडळीतील ग्रामराजकारणात महायुतीची एकहाती सत्ता; महाविकास आघाडीचा धुव्वा

Buldhana पाडळी येथील पैनगंगा कृषक सेवा सहकारी संस्था मर्यादित (ग्रामसेवा सोसायटी) निवडणुकीत महायुतीने एकहाती विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील महायुती प्रणीत ‘बळीराजा पॅनल’ने सर्वच्या सर्व १३ जागांवर दणदणीत विजय मिळवत महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला.

१३ एप्रिल रोजी पार पडलेल्या या निवडणुकीत बळीराजा पॅनलने सर्वच गटांमध्ये स्पष्ट आघाडी घेत विरोधकांना संधीच दिली नाही. त्यामुळे पाडळीतील स्थानिक सहकार राजकारणात महायुतीची पकड अधिक मजबूत झाल्याचे मानले जात आहे.

सर्वसाधारण गटातून जीवनकुमार कडूबा पवार, भास्कर भाऊराव रिंढे, श्रीकांत आत्माराम पवार, दौलत श्रीरंग सुरगडे, शंकर कडूबा तायडे, मोहन मोतीराम धनावत, अशोक किसन तांगडे आणि राजेंद्र नथूसिंग राजपूत हे विजयी झाले. महिला गटातून सुलोचना सारंगधर दांडगे आणि मंदा राजेंद्र गायकवाड यांनी विजय संपादन केला. भटक्या-विमुक्त प्रवर्गातून जगदेव कडूबा नप्ते, अनुसूचित जाती प्रवर्गातून भीमराव सुखदेव जाधव, तर इतर मागास प्रवर्गातून अंबादास सखाराम पवार यांनी विजय मिळवला.

constituency delimitation : रेषा सरकल्या की समीकरणे बदलणार; इच्छुकांची नव्या क्षेत्रात चाचपणी सुरू

या निकालानंतर बुलढाणा येथील शिंदेसेनेच्या ‘मातोश्री’ जनसंपर्क कार्यालयात नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मृत्युंजय गायकवाड, ओमसिंग राजपूत, धनंजय बारोटे, अर्जुन दांडगे, शिवाजी तायडे, गजानन गायकवाड, हरिदास रिंढे, ज्ञानेश्वर पवार, भुजंगराव रिंढे, प्रा. अनिल रिंढे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Yashwant Manohar : आंबेडकर चरित्र-साधने समिती’वरून वादाचे वादळ; समिती बरखास्त करण्याची मागणी

या निकालामुळे पैनगंगा सोसायटीवर महायुतीचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण सहकार क्षेत्रातील हा विजय आगामी स्थानिक स्वराज्य आणि राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाचा मानला जात असून, आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाला ग्रामीण भागातून मिळालेला वाढता पाठिंबा म्हणूनही त्याकडे पाहिले जात आहे. पुढील काळात विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!