maharashtra-vidhan-parishad-election-2026-9-seats-political-equations : विधान परिषदेच्या ९ जागांसाठी इच्छुकांची रांग, उद्धव ठाकरेंची जागा कोण घेणार?
Mumbai: महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी पुढील आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असून, राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या ९ सदस्यांचा कार्यकाळ १३ मे रोजी संपुष्टात येणार असल्याने नव्या सदस्यांची निवड आवश्यक ठरणार आहे. विधानसभेतील विद्यमान संख्याबळ लक्षात घेतल्यास या निवडणुकीत महायुतीला स्पष्ट आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्याच्या आकडेवारीनुसार भाजपला ५ जागा, शिवसेनेला २, राष्ट्रवादी काँग्रेसला १ आणि महाविकास आघाडीला १ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडे अतिरिक्त मते उपलब्ध असल्याने महायुतीने अधिक उमेदवार रिंगणात उतरवल्यास निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी होऊ शकते. त्यामुळे या निवडणुकीत राजकीय समीकरणांमध्ये अनपेक्षित वळण येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दरम्यान, विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता भाजपचे पाच उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. परंतु पक्षामध्ये इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने उमेदवारीसाठी तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. अलीकडील राज्यसभा निवडणुकीत संधी न मिळालेल्या अनेक नेत्यांनी आता विधान परिषदेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे भाजपसह इतर पक्षांमध्येही उमेदवारीसाठी मोठी चढाओढ पाहायला मिळत आहे.
Nashi kcrime news : नाशिकच्या ‘त्या’ कंपनीतील लैंगिक शोषण, धर्मांतर दबाव प्रकरणाने खळबळ!
या निवडणुकीत ज्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यामध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा समावेश आहे. या सर्वांच्या जागी नव्या किंवा पुन्हा निवडून येणाऱ्या सदस्यांची निवड होणार आहे, त्यामुळे पक्षीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत.
विधान परिषद निवडणुकीसाठी एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक असतो. सध्या महायुतीकडे भाजपचे १३१, शिवसेनेचे ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० असे एकूण २२८ आमदारांचे संख्याबळ आहे. या बळावर महायुतीचे ८ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. दुसरीकडे महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ ४६ असल्याने त्यांचा एकच उमेदवार निश्चित निवडून येण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या जागेसाठी आवश्यक असलेली अतिरिक्त मते मिळवणे सध्याच्या परिस्थितीत आव्हानात्मक ठरणार आहे.
Sexual exploitation case : दोन मुलींच्या लैंगिक शोषणाची कबुली, आरोपीच्या घरावर बुलडोजर
भाजपकडून या निवडणुकीसाठी काही प्रमुख नावे चर्चेत आहेत. केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजीतसिंह निंबाळकर आणि राम सातपुते यांच्यासह इतर काही इच्छुकांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. तसेच पक्षाचे काही विद्यमान आमदार निवृत्त होत असल्याने त्यांना पुन्हा संधी दिली जाते की नव्या चेहऱ्यांना वाव मिळतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








