व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sexual exploitation case : दोन मुलींच्या लैंगिक शोषणाची कबुली, आरोपीच्या घरावर बुलडोजर

Sexual exploitation case : दोन मुलींच्या लैंगिक शोषणाची कबुली, आरोपीच्या घरावर बुलडोजर

sexual exploitation of two girls in Paratwada : परतवाडा व्हिडीओ व्हायरल प्रकरणाला नवे वळण; अचलपूर-परतवाडा बंद; कठोर कारवाईची मागणी

Amravati परतवाडा येथे सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला असून, दोन पीडित मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे तपासात समोर आले आहे. मुख्य आरोपी अयान अहमद तनवीर अहमद (१९, रा. परतवाडा) याने अमरावती शहरातील आपल्या मित्राच्या भाड्याच्या खोलीत मुलींवर अत्याचार केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

मुख्य आरोपी अयानच्या अटकेनंतर तपासाला वेग आला. चौकशीत त्याने अमरावतीतील मित्राच्या खोलीवर नेऊन दोन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे मान्य केले. संबंधित मित्र काही तासांसाठी आपली खोली उपलब्ध करून देत असल्याचेही समोर आले असून, त्या मित्रालाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पीडित मुली अद्याप समोर आलेल्या नसल्या, तरी तांत्रिक पुराव्यांतून अत्याचाराची पुष्टी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी सहायक पोलिस अधीक्षक डॉ. शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखाली ४५ सदस्यीय विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले आहे. यात ११ अधिकारी आणि ३४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. आरोपींनी पीडित मुलींचे १८ व्हिडिओ आणि ३९ फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचे समोर आले आहे. काही डेटा डिलीट करण्यात आला असला, तरी पोलिसांनी पाच मोबाईल जप्त करून फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले आहेत.

Nagpur municipal corporation : काँग्रेसमध्ये ‘स्वीकृत’वरून ठिणगी; ४६ वर्षांची निष्ठा वाऱ्यावर, ज्येष्ठ नेते कमलेश समर्थांचा राजीनामा!

चार मुख्य आरोपी अटकेत
१६ एप्रिलला पहाटेपर्यंत पोलिसांनी चार मुख्य आरोपींना अटक केली आहे :
अयान अहमद तनवीर अहमद (१९) – मुख्य आरोपी
उजेरखान इकबाल खान (२०) – व्हिडिओ डाउनलोड करून प्रसारित करणारा
मोहम्मद साद मोहम्मद साबीर (२२) – व्हॉट्सॲपवरून व्हिडिओ शेअर करणारा
तरबेज खान तसलिम खान (२४) – व्हिडिओ प्रसारात सक्रिय सहभाग
याशिवाय, अन्य दोघांना ताब्यात घेण्यात आले असून चार संशयितांची चौकशी सुरू आहे.

मुख्य आरोपी अयान अहमद याच्या घराबाहेरील अतिक्रमणाविरोधात तक्रार आल्यानंतर अचलपूर नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई केली. अतिक्रमित जिना आणि अन्य बांधकाम बुलडोझरने हटविण्यात आले. ही कारवाई आमदार प्रवीण तायडे यांच्या उपस्थितीत पार पडली.

Nagpur municipal corporation : नागपूर महापालिकेत एमआयएम-मुस्लिम लीगमध्ये हायव्होल्टेज ड्रामा; अंतर्गत राड्यामुळे स्वीकृत सदस्याची संधी हुकली

घटनेच्या निषेधार्थ अचलपूर-परतवाडा जुळी शहरे कडकडीत बंद ठेवण्यात आली. हिंदू सकल समाजाच्या कार्यकर्त्यांनी आमदार प्रवीण तायडे यांच्या नेतृत्वाखाली एसपी कार्यालयावर मोर्चा काढून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. खासदार बळवंत वानखडे यांनीही विशेष पोलिस महानिरीक्षक रामनाथ पोकळे आणि एसपी विशाल आनंद यांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी केली.

‘मुख्य आरोपी अयान याने अमरावतीतील मित्राच्या भाड्याच्या खोलीत पीडित मुलींचे लैंगिक शोषण केल्याची कबुली दिली आहे. त्या खोलीची ओळख पटली आहे. शहर पोलिसांच्या मदतीने पुढील तपास केला जाईल. आतापर्यंत चार आरोपींना अटक झाली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे,’ अशी माहिती पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली.

error: Content is protected !!