Ralegao case accused will be punished, minister Ashok uikey assured: मंत्री अशोक उके यांची ग्वाही, फडणवीसांनी पोलीस अधीक्षकांसोबत चर्चा
Nagpur राळेगाव शहरात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेला प्रकार हा अतिशय गंभीर असून, राज्य सरकारने याची पूर्णतः दखल घेतली आहे. या प्रकरणाबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांशी फोनवरून चर्चा केली असून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला आहे, अशी माहिती मंत्री अशोक उके यांनी दिली.
या प्रकरणाच्या संवेदनशीलतेवर भाष्य करताना अशोक उके म्हणाले की, मी स्वतः या विषयावर मुख्यमंत्र्यांशी सविस्तर बोललो असून राळेगाव शहर आणि तिथल्या प्रशासकीय हालचालींवर आमचे पूर्ण लक्ष आहे. पोलीस विभागामार्फत या प्रकरणाची सखोल चौकशी सध्या सुरू आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या मजल कुरेशी नावाच्या व्यक्तीवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, कायद्यानुसार पुढील प्रक्रिया पार पडत आहे.
Devendra fadnavis : महिला आरक्षणाला विरोध करणारे ‘सिरीयल लायर्स’, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
पोलीस विभागाच्या तपासानंतर लवकरच सर्व सत्य बाबी समोर येतील आणि कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. सध्या संपूर्ण राळेगाव प्रशासन आणि पोलीस यंत्रणा परिस्थितीवर नियंत्रण ठेवून असून, नागरिकांनी शांतता राखण्याचे आवाहनही सरकारकडून करण्यात आले आहे.








