व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Nari shakti vandan vidheyak : भाजपचा खटाटोप सत्ता टिकवण्यासाठी, काँग्रेसची टीका

Nari shakti vandan vidheyak : भाजपचा खटाटोप सत्ता टिकवण्यासाठी, काँग्रेसची टीका

Congress criticises BJP, alleging attempts to retain power under the pretext of women’s reservation bill : महिला आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप; ‘डी-लिमिटेशन’वरून भाजपवर निशाणा

Akola भारतीय जनता पक्षाने महिला आरक्षण विधेयकाचा गाजावाजा केला असला, तरी प्रत्यक्षात ‘डी-लिमिटेशन’च्या माध्यमातून सत्ता टिकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. काँग्रेस नेते प्रशांत गावंडे आणि प्रदेश सचिव अक्षय राऊत यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप केला.

यावेळी प्रशांत गावंडे म्हणाले की, भाजपकडून काँग्रेस व इतर मित्रपक्ष महिला आरक्षणाला विरोध करीत असल्याचा प्रचार केला जात आहे. मात्र, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विद्यमान ५४३ जागांवरच महिला आरक्षण लागू करण्यास काँग्रेसचा विनाशर्त पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजप विविध माध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरवत असून, आंदोलन, मोर्चे आणि महिलांच्या सह्यांद्वारे विरोधकांना महिला विरोधी ठरवण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप करण्यात आला.

BJP, Vanchit Bahujan Aghadi : ‘आमच्यामुळेच उड्डाणपुलाच्या कामाला मंजुरी’, श्रेयवादाचे राजकारण सुसाट

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर खुल्या चर्चेचे आव्हान दिले होते. काँग्रेसने हे आव्हान स्वीकारले असून, चर्चा लवकरात लवकर निश्चित करण्याची मागणी केली आहे. तसेच खासदार अनुप धोत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकडे, आमदार हरिष पिंपळे, महापौर शारदा खेडकर, माजी महापौर विजय अग्रवाल आणि संतोष शिवरकर यांपैकी कोणत्याही एका नेत्याने जाहीर चर्चेत सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!