ncp-sunetra-pawar-three-layer-system-parth-jay-pawar-responsibility-marathi-news : अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवारांचा मोठा निर्णय
Pune: अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेतृत्वाची सूत्रे हाती घेतलेल्या सुनेत्रा पवार यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी महत्त्वाचा धोरणात्मक निर्णय घेत ‘थ्री लेअर सिस्टीम’ लागू केली आहे. या नव्या रचनेनुसार पक्षातील प्रमुख जबाबदाऱ्या कुटुंबातच तिहेरी पातळीवर वाटण्यात आल्या असून पार्थ पवार आणि जय पवार यांच्यावरही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या निर्णयामुळे पक्षातील अंतर्गत घडामोडींना नवे वळण मिळाले असून भविष्यातील राजकीय रणनीती स्पष्ट झाल्याचे मानले जात आहे.
या नव्या संरचनेत सुनेत्रा पवार स्वतः राज्यभर दौरे करून संघटनात्मक कामकाज आणि राजकीय निर्णयांवर लक्ष ठेवणार आहेत. तर खासदार पार्थ पवार यांच्याकडे दिल्ली आणि मुंबईतील राजकीय समन्वय, केंद्रीय स्तरावरील संपर्क आणि पक्षाचे प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. दुसरीकडे जय पवार यांच्याकडे बारामती आणि पुणे ग्रामीण भागातील संघटनात्मक बळकटीकरणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे पक्षाच्या कामकाजात विभागनिहाय स्पष्ट भूमिका निश्चित करण्यात आली आहे.
Petrol diesel price : पेट्रोल-डिझेलचे भाव २५-२८ रुपयांनी वाढणार नाहीत!
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत स्तरावर हालचाली वाढल्या होत्या. अजित पवार यांच्या निधनानंतर काही ज्येष्ठ नेते पक्षाची सूत्रे आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर भविष्यातील कोणताही राजकीय धोका टाळण्यासाठी सुनेत्रा पवार यांनी पक्षाची निर्णायक सूत्रे आपल्या कुटुंबातच ठेवण्याचा निर्णय घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दरम्यान, पार्थ पवार आणि जय पवार हे दोघेही अलीकडच्या काळात अधिक सक्रिय झाले आहेत. पार्थ पवार यांची राज्यसभेवर निवड झाल्यानंतर त्यांची राष्ट्रीय पातळीवरील भूमिका बळकट झाली आहे, तर जय पवार यांनी बारामतीत जनसंपर्क वाढवत स्थानिक राजकारणात आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. बारामती पोटनिवडणुकीदरम्यान जय पवार यांनी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे पुढील राजकीय समीकरणांची झलक दिसली.
Sanjay gaikwad : ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून प्रकाशकाला धमकी प्रकरणात तक्रार दाखल !
याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनीही २०२९ मध्ये बारामतीत पुन्हा ‘पवार विरुद्ध पवार’ अशी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जय पवार उमेदवार असतील तर दुसऱ्या बाजूने युगेंद्र पवार यांचे नाव पुढे येऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले. त्यामुळे आगामी काळात बारामती आणि राज्याच्या राजकारणात पवार कुटुंबातील अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
एकूणच, सुनेत्रा पवार यांनी घेतलेला ‘थ्री लेअर सिस्टीम’चा निर्णय हा पक्ष संघटना सुदृढ ठेवण्यासोबतच भविष्यातील राजकीय आव्हानांना तोंड देण्यासाठी आखलेली रणनीती मानली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचा पक्षाच्या कामगिरीवर काय परिणाम होतो, याकडे राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागले आहे.
___








