Congress leader vijay wadettiwar writes letter to cm devendra fadnavis demanding action against sanjay gaikwad : ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी दिल्याची गायकवाडांची ऑडिओ क्लिप व्हायरल
Nagpur शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची मुजोरी आता टोकाला पोहोचली असून, ‘शिवाजी कोण होता’ या प्रसिद्ध पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना दिलेल्या जीवे मारण्याच्या धमकीमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे. प्रशांत आंबी यांना अत्यंत अर्वाच्य भाषेत आई-बहिणीवरून शिवीगाळ करत “तुझाही गोविंद पानसरे करतो” अशी थेट धमकी गायकवाडांनी दिली असून, या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर वाऱ्यासारखी व्हायरल झाली आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक पवित्रा धारण केला असून, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
“जर सरकारने या गुंडगिरीची दखल घेतली नाही, तर संजूला गंजू केल्याशिवाय आम्ही राहणार नाही,” असा थेट इशारा वडेट्टीवार यांनी दिल्याने आता शिंदे-फडणवीस सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. आमदार गायकवाड हे नेहमीच आपल्या दादागिरीसाठी चर्चेत असतात; यापूर्वी त्यांनी मुंबईतील आमदार निवासच्या कँटीन कर्मचाऱ्यालाही मारहाण केली होती. मात्र, आता थेट कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा संदर्भ देऊन धमकी देणे, हे केवळ एका व्यक्तीला दिलेले आव्हान नसून महाराष्ट्राच्या प्रगत वैचारिक परंपरेवर केलेला हल्ला आहे.
Sunetra pawar : कुटुंबात ‘थ्री लेअर सिस्टीम’; पार्थ आणि जय पवारांवर महत्त्वाची जबाबदारी
कॉ. पानसरे यांच्या हत्येचे समर्थन करणारी भाषा आमदार वापरत असतील, तर राज्यात कायद्याचे राज्य आहे की ‘जंगलराज’ सुरू आहे? असा बोचरा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. प्रकाश आंबी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुरोगामी आणि प्रगत विचार समाजात पोहोचवण्याचे पवित्र कार्य करत आहेत. महाराष्ट्रात विचारवंतांच्या हत्यांचा काळा इतिहास असताना, एका जबाबदार लोकप्रतिनिधीने जाहीरपणे अशी हत्येची धमकी देणे ही अत्यंत चिंतेची बाब आहे.
Vijay Wadettiwar : भाजपचा ‘असली’ चेहरा उघड; महिला आरक्षणाच्या नावाखाली देशाची दिशाभूल!
ऑडिओ क्लिप उघड होऊनही गृहखाते गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ का करत आहे, असा संतप्त प्रश्न विचारत वडेट्टीवार यांनी आंबी यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची आणि आमदार संजय गायकवाडांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मोठा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.








