व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Nitin Gadkari : ‘२४/७’ पाणी योजनेवरून गडकरी पुन्हा बरसले, प्रशासनावर व्यक्त केला...

Nitin Gadkari : ‘२४/७’ पाणी योजनेवरून गडकरी पुन्हा बरसले, प्रशासनावर व्यक्त केला संताप

Nitin Gadkari expresses anger at the administration over the ‘24/7’ water supply scheme in Nagpur : ‘बाबुगिरी’ आणि ‘घरबसल्या’ डीपीआर बनवणाऱ्यांवर ओढले ताशेरे

Nagpur नागपूर महानगरपालिकेची अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि बहुचर्चित २४/७ पाणी पुरवठा योजना पूर्णपणे फसली असल्याचा संताप केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. नागपूरमध्ये या योजनेचा केवळ प्रयोग झाला, पण त्यात अनेक त्रुटी राहिल्याने ती यशस्वी होऊ शकली नाही, असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. विशेष म्हणजे, गडकरींची ही महत्त्वाकांक्षी योजना होती. मात्र, योजनेच्या अपयशावर त्यांनी आता जाहीर भाष्य केल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

आयवाचे माजी अध्यक्ष डॉ. संजय दहासहस्र यांच्या ‘२४/७ वॉटर सप्लाय इंजिनीअरिंग’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलताना गडकरींनी प्रशासकीय अनागोंदीचा पाढाच वाचला. ते म्हणाले की, देशाच्या विकासासाठी आणि पायाभूत सुविधांसाठी २४ तास पाणी पुरवठा आवश्यक आहे, मात्र नागपूरची योजना सपशेल अपयशी ठरली आहे. आज आपल्याकडे डीपीआर (विकास आराखडा) तयार करणे ही सर्वात मोठी समस्या बनली आहे. कन्सल्टंट आणि अधिकारी फिल्डवर न जाता घरी बसून गुगलच्या साहाय्याने आराखडे तयार करतात. हे आराखडे तयार व्हायला ३०-३० वर्षे लागतात आणि तोपर्यंत नियोजित जागेवर बांधकामे झालेली असतात. ही ‘बाबुगिरी’ विकासकामांच्या आड येत आहे.

Sudhir Mungantiwar : शब्द दिला की पूर्ण करतात; म्हणूनच वेगळे ठरतात मुनगंटीवार!

प्रशासनातील त्रुटींवर बोट ठेवताना गडकरींनी महापालिकेच्या इंजिनिअर्सच्या पात्रतेवरही शंका उपस्थित केली. अनेक अधिकारी काहीही काम न करता फुकटात पगार लाटत आहेत. चांगले काम करणाऱ्यांचा सन्मान नाही आणि चुका करणाऱ्यांना शिक्षा नाही, अशी सध्याची स्थिती आहे. टेंडर प्रक्रियेत तर मुलाच्या जन्माआधीच त्याचे आई-बाप ठरवले जातात, इतका मोठा भ्रष्टाचार आणि वशिलेबाजी सुरू आहे. अनेकदा एक ठेकेदार पाईप टाकतो तर दुसरा वॉल्व लावतो, त्यांच्यात कसलाही ताळमेळ नसतो. कामाची गुणवत्ता इतकी खालावली आहे की, ७० टक्के काम केल्यानंतर ठेकेदार उर्वरित पैशांसाठी येतच नाहीत, इतके प्रॉब्लेम्स त्यात आहेत, अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

Bageshwar baba controversy : शिवरायांच्या पुण्याईने ‘बाबा’ आहात, नाहीतर ‘मौलवी’ असता!

मी स्वतः इंजिनिअर नाही पण माझ्या अनुभवातून मी हे सांगतोय, असे म्हणत त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. पीपीपी मॉडेल असो किंवा पाणी पुरवठ्याची पाईपलाईन, सध्या ज्याच्या हाती काठी, त्याची म्हैस असेच चित्र दिसत असल्याचे त्यांनी नमूद केले. भविष्यात केवळ आर्थिक ऑडिट करून चालणार नाही, तर ‘परफॉर्मन्स ऑडिट’ करणे काळाची गरज असून, तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या सुधारणा केल्याशिवाय ही परिस्थिती बदलणार नाही, असा इशाराही नितीन गडकरी यांनी यावेळी दिला.

error: Content is protected !!