Renovation of the assembly hall in the administrative building at Mul once again proves the sense of responsibility of Sudhir Mungantiwar as a public representative : मुल येथील प्रशासकीय भवनातील सभागृहाच्या नुतनीकरणामुळे पुन्हा एकदा प्रचिती
Chandrapur राजकारणात आश्वासनांना मर्यादा नसते. उणीव असते ती त्या आश्वासनांना कृतीत उतरवणाऱ्या नेतृत्वांची. अनेकदा घोषणा होतात, टाळ्या वाजतात, मथळे बनतात; पण काळाच्या ओघात सगळी आश्वासने फाईल्सच्या ढिगाऱ्यात हरवून जातात. अशा वातावरणात ‘दिलेल्या शब्दाला जबाबदारी’ मानणारे नेतृत्व दुर्मिळ ठरते आणि म्हणूनच आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे नाव राज्याच्या विकासाच्या राजकारणात वेगळेपणाने घेतले जाते. मुल येथील प्रशासकीय भवनातील सभागृहाच्या नुतनीकरणामुळे पुन्हा एकदा याची प्रचिती आली.
सभागृहाचे नूतनीकरण ही केवळ एक विकासकामाची नोंद नाही, तर मुनगंटीवारांच्या कार्यशैलीचा दाखला आहे. २ मे २०२५ रोजी तालुक्याच्या आढावा बैठकीदरम्यान सभागृहातील अपुऱ्या सुविधा त्यांच्या निदर्शनास आल्या. अनेकांसाठी तो फक्त निरीक्षणाचा विषय असता; पण मुनगंटीवारांसाठी तो जनतेच्या सोयी-सुविधांचा प्रश्न होता. त्यांनी तात्काळ नूतनीकरणाचे निर्देश दिले.
Bageshwar baba controversy : शिवरायांच्या पुण्याईने ‘बाबा’ आहात, नाहीतर ‘मौलवी’ असता!
मुनगंटीवार केवळ घोषणा करून थांबले नाहीत. जून २०२५ मध्ये सुमारे १ कोटी २९ लाख ९६ हजार रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. पाठपुरावा, नियोजन आणि प्रशासनाशी सातत्यपूर्ण संवाद यामुळे अवघ्या एका वर्षात वातानुकूलित, आधुनिक आणि सर्वसामान्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविणारे सुसज्ज सभागृह उभे राहिले. २४ एप्रिल २०२६ रोजी त्याचे लोकार्पण झाले. आणि एक गोष्ट पुन्हा स्पष्ट झाली… मुनगंटीवार शब्द देतात, तो पूर्ण करण्यासाठीच!
मुनगंटीवारांच्या ही कार्यपद्धती जनतेसाठी नवी नाही. ही त्यांची शैलीच आहे. यापूर्वी मुल तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय, डायलिसिस सेंटर, सिमेंट काँक्रीट रस्ते, तहसील कार्यालय, पंचायत समिती इमारत, इको पार्क यांसारख्या अनेक कामांमध्येही हाच सातत्यपूर्ण वेग बघायला मिळतो. ‘विकास’ हा काही भाषणांमधून टोलवण्यासाठी असलेला चेंडू नाही, तर आपल्या प्रत्यक्ष आणि काँक्रिट कामांमधून जनतेला त्याची प्रचिती देण्याची बाब आहे. सर्वसामान्य जनतेला दैनंदिन जीवनात त्याचा परिणाम जाणवला पाहिजे, या भूमिकेवर मुनगंटीवार ठाम आहेत… म्हणूनच ते वेगळे आहेत.
राजकारणात ‘घोषणा’ झाली की त्याची बातमी होते; पण ‘वचनपूर्ती’ झाली की इतिहासात नोंद होते. जनतेच्या विश्वासाला न्याय देत, शब्द आणि कृती यांची सांगड घालणारे नेतृत्व म्हणूनच मुनगंटीवार यांच्याकडे बघितले जाते. म्हणूनच अनेकांच्या तोंडी एकच वाक्य ऐकू येते.. दिलेला शब्द पाळणारा नेता म्हणजे सुधीर मुनगंटीवार!








