व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Bageshwar baba controversy : शिवरायांच्या पुण्याईने ‘बाबा’ आहात, नाहीतर ‘मौलवी’ असता!

Bageshwar baba controversy : शिवरायांच्या पुण्याईने ‘बाबा’ आहात, नाहीतर ‘मौलवी’ असता!

By the grace of Chhatrapati Shivaji Maharaj, you are called ‘Baba’; otherwise, you would have been a ‘Maulvi’!, attack by Mudhoji Raje Bhosle on Bageshwar Baba : मुधोजी राजेंचा बागेश्वर बाबावर जळजळीत प्रहार; विचारला ‘सुपारी’चा जाब

Nagpur आपल्या वादग्रस्त विधानांनी वारंवार चर्चेत राहणारे धीरेंद्र शास्त्री ऊर्फ बागेश्वर बाबा नागपुरात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्यामुळे शिवप्रेमींच्या तीव्र रोषाला बळी पडले आहेत. छत्रपती शिवराय लढाया करून थकले होते आणि त्यांनी राज्य सांभाळण्यासाठी रामदास स्वामींना विनंती केली होती, या धादांत खोट्या विधानाचा समाचार घेताना नागपूरचे राजे मुधोजी भोसले यांनी संताप करून बागेश्वर बाबाचा जाहीर निषेध केला आहे.

राजे मुधोजी भोसले यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत बागेश्वर बाबाला थेट शेलक्या शब्दांत सुनावले आहे. सध्या ‘NCERT’ च्या पुस्तकातून शिवरायांचा पराक्रम आणि इतिहासाची पाने गाळल्याच्या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलने सुरू असतानाच शास्त्रींनी हे विधान केले आहे. यावर मुधोजी राजे म्हणाले, तुम्ही उत्तर भारतातून NCERT ची सुपारी घेऊन महाराष्ट्रात आला आहात का? इतिहासाचा मूळ मुद्दा भरकटवण्यासाठीच तुम्ही हे विधान केले आहे का?” असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.

Bageshwar baba statement on Shivaji Maharaj : शिवरायांचा अपमान करणाऱ्या बागेश्वर बाबाला ‘ढगात’ कधी पाठवणार?

शास्त्रींना आरसा दाखवताना मुधोजी राजे पुढे म्हणाले की, अखंड हिंदुस्थानचे दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी देव, देश आणि धर्मासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. ज्या शिवरायांच्या पुण्याईमुळे आज तुम्ही स्वतःला ‘बाबा’ म्हणवून घेत आहात, ते महाराज नसते तर तुम्ही आज ‘मौलवी’ राहिला असता, हे विसरू नका. जे स्वतःला धर्माचे रक्षक म्हणवतात, तेच आज धर्माच्या दैवताबद्दल चुकीची विधाने करत आहेत, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.”

Thackeray fadnavis meeting : उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांच्यात वर्षा बंगल्यावर खलबते !

शासनाला NCERT च्या मुद्द्यावर आधीच अल्टिमेटम देण्यात आला असताना, बागेश्वर बाबाच्या या वक्तव्याने आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. आम्ही साधू-संतांचा आदर नेहमीच करतो, परंतु शिवरायांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण करणाऱ्या प्रवृत्तींना कधीही माफ करणार नाही, असा इशारा मुधोजी राजेंनी दिला आहे. आता या वादामुळे राज्यात बागेश्वर बाबा विरोधात जनक्षोभ उसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!