Padayatra sparks internal conflict in Congress; race for show of strength intensifies : जिल्हाध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये राडा; पदयात्रा बनली ‘पॉवर शो’
Buldhana काँग्रेसच्या ‘संघटन सृजन’ अभियानांतर्गत सुरू असलेली ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’ सध्या जिल्ह्यात केवळ जनसंपर्क मोहिमेपुरती मर्यादित न राहता थेट अंतर्गत शक्तिप्रदर्शनाचे रणांगण बनल्याचे चित्र दिसत आहे. जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचत असतानाच या पदयात्रेतून ‘पद’ मिळविण्याची चढाओढ उघडपणे समोर येत आहे.
जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यांतील इच्छुक नेत्यांनी या पदयात्रेला प्रतिष्ठेचा प्रश्न बनवला आहे. प्रत्येक गटाकडून मोठ्या प्रमाणात गर्दी जमवणे, बॅनरबाजी आणि समर्थकांची ताकद दाखवण्याची स्पर्धा सुरू असून, “जास्त माणसं म्हणजे जास्त राजकीय वजन” हा फॉर्म्युला प्रत्यक्षात उतरल्याचे दिसते.
Agriculture service centre : आम्ही चोर नव्हे, तर शेतकऱ्यांना सेवा देणारे व्यावसायिक आहोत
प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे स्वतः बुलढाणा जिल्ह्याशी संबंधित असल्याने त्यांच्या ‘गुड बुक’मध्ये स्थान मिळवण्यासाठी इच्छुकांमध्ये तीव्र चुरस निर्माण झाली आहे. गावोगावी संपर्क मोहीम, कार्यकर्त्यांचे संघटन आणि पदयात्रेत मोठी उपस्थिती दाखवण्यावर भर दिला जात आहे.
Water shortage : आढावा बैठकीत 82 गावांतील पाणीटंचाई गाजली; हलगर्जी करणारे अधिकारी रडारवर
पक्ष संघटन मजबूत करणे हा या अभियानाचा अधिकृत उद्देश असला, तरी प्रत्यक्षात हीच जिल्हाध्यक्षपदासाठीची ‘अनौपचारिक चाचणी’ ठरत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्यामुळे पदयात्रा संपेपर्यंत आणखी किती शक्तिप्रदर्शन होणार आणि अखेरीस हर्षवर्धन सपकाळ कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.








