व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण BJP Shivsena Eknath Shinde : भाजपचे माजी महानगराध्यक्ष, नगरसेवक शिंदेंच्या सेनेत

BJP Shivsena Eknath Shinde : भाजपचे माजी महानगराध्यक्ष, नगरसेवक शिंदेंच्या सेनेत

Hundreds of office-bearers from Akola join Shivsena : अकोल्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

Akola जिल्ह्यात शिवसेनेत प्रवेशाची लाट उसळली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथील गंगूबाई शिंदे सभागृहात अकोला शहरातील शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. भाजपचे माजी महानगराध्यक्ष तथा माजी नगरसेवक डॉ. अशोक ओळंबे यांनीही यावेळी शिवसेनेत प्रवेश घेतला. विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करून पक्षबळ वाढवले.

या प्रवेश सोहळ्यात डॉ. अशोक ओळंबे पाटील, बबलू उके, राजेश डांगे, रमेश कानापुरे, सुधाकर चव्हाण, शुभम डांगे, प्रफुल्ल पोंडे, आनंद गुरखे, संतोष टप्पे, आशिष हटवुळे, संदेश वानखेडे, आकाश शिरसाठ, रोहन वानखेडे, सिद्धार्थ नागापुरे, अशोक डांगे पाटील, मनोज बाविस्कर, गणेश केंकरे, रोहित पुळकाळ, शीला काळे, जिजा विधाते, अर्चना हिरे, नीता काळे, संगीता मेनूर, निर्मला इंगळे, कृष्णा इंगळे, सुनीता बाजार यांच्यासह अनेकांचा समावेश होता.

Akola Municipal corporation : लवकरच अकोलात श्वास घेण्यासाठीही कर भरावा लागेल, स्थायी समितीवर संताप

यावेळी शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, संपर्कप्रमुख राजन साळवी, जिल्हाप्रमुख नारायणराव गव्हाणकर, चंद्रशेखर पांडे, अश्विन नवले, उषा विरक, राजेश मिश्रा, ललित वानखेडे, मंगेश काळे, मनोज पाटील व सागर भारूका यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश पार पडला.

Rohit Pawar : रोहीत पवार यांचा बुलढाणा दौरा रद्द, मोर्चापूर्वी मंडप अन् खुर्च्या नेल्या काढून

भारतीय जनता पक्षात तीस वर्षांत सलग प्रतीक्षा करूनही अपेक्षित सन्मान व संधी न मिळाल्याने विधानसभा निवडणुकीत डॉ. ओळंबे यांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला होता. निवडणुकीनंतर ते पुन्हा भाजपच्या वाटेवर असताना शिवसेनेत प्रवेश करून आश्चर्याचा धक्का दिला आहे.6

error: Content is protected !!