Don’t view the Sharad Pawar–Sunil Tatkare meeting through a political lens,” Bawankule takes a swipe at the Opposition : जुन्या स्नेहींची भेट घेणे सामाजिक आणि कौटुंबिक गरज असल्याचे सांगत वादावर पडदा
Nagpur राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुनील तटकरे यांच्यात झालेल्या भेटीवरून राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. मात्र, या भेटीला राजकीय रंग देणे पूर्णपणे चुकीचे असल्याचे मत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. कधीकधी आपल्या जुन्या स्नेहींची भेट घेणे ही सामाजिक आणि कौटुंबिक गरज असते, अशा शब्दांत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय आणि प्रशासकीय मुद्द्यांवर भाष्य केले.
पवार-तटकरे भेटीवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, तटकरे कुटुंबीयांनी आयुष्यभर शरद पवार यांना राजकीय आणि सामाजिक कार्यात साथ दिली आहे. अशा परिस्थितीत जुन्या सहकाऱ्यांशी चर्चा करणे स्वाभाविक आहे. स्वतःचे उदाहरण देताना त्यांनी सांगितले की, मी सुद्धा काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. अशा भेटीगाठींना प्रत्येक वेळी राजकारणाशी जोडणे योग्य नाही.
मतीन घरपाडकाम आणि निदा खान प्रकरणावर बावनकुळे यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली. गंभीर आरोपाखाली असलेल्या आरोपींना राजकीय आश्रय मिळणे ही खेदजनक बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. समाजाला हादरवणाऱ्या गुन्ह्यांतील आरोपींना मदत करणे ही आमची संस्कृती नाही आणि ती सर्वच राजकीय पक्षांनी पाळली पाहिजे, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. परभणीतील वाळू माफियांचा विषय असो वा बुलढाण्यातील तहसीलदारांवरील हल्ला, अशा प्रकरणात सरकार आरोपींना सोडणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
Rohit pawar : महाराष्ट्राच्या राजकारणात नवा भूकंप? तटकरे-पटेल भाजपच्या वाटेवर!
प्रशासकीय कामकाजात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘काटकसरी’च्या मंत्राचा पुनरुच्चार करत बावनकुळे म्हणाले की, मी स्वतः माझ्या ताफ्यात कपात केली असून बैठकांसाठी प्रत्यक्ष प्रवास टाळून ऑनलाइन संवादावर भर देत आहे. देश मजबूत करण्यासाठी आणि स्वदेशीचा पुरस्कार करण्यासाठी काही काळ काटकसर करणे ही काळाची गरज आहे. ऐतिहासिक संदर्भांचा आधार घेत त्यांनी महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि पी. चिदंबरम यांनी केलेल्या आवाहनांची आठवण करून देत, स्वदेशी जीवनशैलीचा आग्रह धरला.








