व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Ladki Bahin Scheme : ई-केवायसीतील त्रुटींमुळे ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ बंद, बहिणी...

Ladki Bahin Scheme : ई-केवायसीतील त्रुटींमुळे ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ बंद, बहिणी अस्वस्थ!

Benefits under the ‘Ladki Bahin’ scheme halted due to errors in e-KYC : पुन्हा संधी देण्याची महिलांची सरकारला मागणी; ग्रामीण भागात नाराजी

Akola राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण’ योजनेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे हजारो महिलांचा लाभ अचानक बंद झाल्याची बाब समोर आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे पात्र महिलांना योजनेपासून वंचित राहावे लागत असल्याने ग्रामीण भागात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

“आम्ही पात्र आहोत, मग आमचा लाभ बंद का?” असा सवाल महिलांकडून उपस्थित केला जात आहे. मोबाईल उपलब्ध नसणे, ओटीपी न मिळणे, सेवा केंद्रांवरील गर्दी, इंटरनेट समस्या तसेच आधार लिंकिंगमधील त्रुटी यामुळे अनेक महिलांना वेळेत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करता आली नाही. काही महिला आजारपणामुळे तर काही मजुरीच्या कामामुळे प्रक्रिया पूर्ण करू शकल्या नसल्याचे समोर आले आहे.

ATS detained suspected : पाकिस्तान कनेक्शनचा संशय; वाशिममधील युवक एटीएसच्या ताब्यात, अकोल्यातील युवकाचीही चौकशी

लाभ बंद झाल्यामुळे अनेक कुटुंबांचा आर्थिक आधार डळमळीत झाला आहे. ग्रामीण भागातील महिलांनी सांगितले की, योजनेतून मिळणारी रक्कम घरखर्च, औषधे आणि मुलांच्या शिक्षणासाठी महत्त्वाची ठरत होती. लाभ थांबल्याने पुन्हा आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान, अनेक महिलांनी सेवा केंद्रांवर वारंवार फेऱ्या मारल्या. मात्र, सर्व्हर डाऊन, तांत्रिक बिघाड आणि प्रचंड गर्दीमुळे प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. परिणामी, पात्र असूनही लाभापासून वंचित राहावे लागल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी शासनाला ई-केवायसी प्रक्रियेसाठी पुन्हा मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायत स्तरावर विशेष शिबिरे, मोबाईल सहायता केंद्रे आणि तांत्रिक मदत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही पुढे येत आहे.

hike in MSP rates : शेतमालावरील हमीभाव दरवाढ म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार

“एक चूक झाली म्हणून आयुष्यभराची शिक्षा का?” असा प्रश्न उपस्थित करत महिलांनी शासनाने संवेदनशील भूमिका घेऊन पात्र लाभार्थींना आणखी एक संधी द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, हा केवळ ई-केवायसीचा प्रश्न नसून अनेक गरीब महिलांच्या जगण्याशी आणि कुटुंबाच्या आर्थिक आधाराशी संबंधित मुद्दा आहे.

error: Content is protected !!