Ballarpur Achieves 100% Performance in ‘Mann Ki Baat’ Campaign Across Maharashtra; MLA Sudhir Mungantiwar Congratulated by State BJP President : मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखालील भाजप कार्यकर्त्यांचे उल्लेखनीय यश
Chandrapur पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या १३४व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात १०० टक्के बूथवर यशस्वी आयोजन करत तब्बल १० हजार २३ नागरिकांपर्यंत हा संवाद पोहोचविण्यात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखालील भाजप कार्यकर्त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या प्रभावी संघटनात्मक कामगिरीची भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी विशेष दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांना अभिनंदनपर पत्र पाठवून त्यांचे आणि सर्व कार्यकर्त्यांचे कौतुक केले आहे. प्रदेशाध्यक्षांनी आपल्या पत्रातून आ. मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि समर्पित कार्याची प्रशंसा केली असून १०० टक्के बूथ लक्ष्य पूर्ण केल्याबद्दल कार्यकर्त्यांचेही अभिनंदन केले आहे.
प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी पत्रात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी दर महिन्याच्या प्रत्येक रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशातील नागरिकांशी थेट संवाद साधतात. या कार्यक्रमातून समाजातील सकारात्मक, प्रेरणादायी आणि राष्ट्रहिताच्या कार्यांना व्यापक व्यासपीठ मिळते. सामान्य नागरिकांच्या असामान्य कार्याची दखल घेत देशाला प्रगत, सक्षम आणि आत्मनिर्भर बनविण्याची प्रेरणा यातून मिळते. त्यामुळे ‘मन की बात’ हा केवळ संवादाचा कार्यक्रम नसून जनजागृती आणि राष्ट्रनिर्मितीचा प्रभावी उपक्रम ठरला आहे. ३१ मे २०२६ रोजी प्रसारित झालेल्या १३४व्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या निमित्ताने बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व बूथवर उत्कृष्ट कार्यक्रम करण्यात आला.
Harshwardhan sapkal: सपकाळ पर्व सुरू होताच महाराष्ट्र काँग्रेसमध्ये बंडाचे निशाण!
बूथस्तरावरील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे तब्बल १० हजार २३ नागरिकांनी कार्यक्रमाचे श्रवण केले, ज्यामुळे पक्षाचे संघटनात्मक बळ, कार्यकर्त्यांची बांधिलकी आणि जनसंपर्काची प्रभावी क्षमता अधोरेखित झाली आहे. पक्षाच्या विचारांचा प्रसार आणि केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य प्रभावीपणे पार पाडल्याबद्दल त्यांनी भाजप परिवाराचे विशेष कौतुक केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल आनंद व्यक्त करताना आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, मन की बात कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रात १०० टक्के बूथ लक्ष्य पूर्ण झाल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे मनस्वी अभिनंदन. बल्लारपूर मतदारसंघात तब्बल १०,०२३ नागरिकांनी हा कार्यक्रम ऐकला, ही केवळ आकडेवारी नसून आपल्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेची, समर्पणाची आणि संघटनशक्तीची जिवंत साक्ष आहे. बल्लारपूर विधानसभेत भाजपाचे सोन्यासारखे कार्यकर्ते आहेत ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब असून प्रत्येक बूथवर, गावात आणि वॉर्डात कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रमच या यशामागची खरी ताकद आहेत.
अशीच एकजूट, जिद्द आणि राष्ट्रसेवेची भावना कायम ठेवत बल्लारपूर विधानसभा देशातील सर्वाधिक मन की बात श्रवण करणाऱ्या मतदारसंघांपैकी एक बनविण्याचे आपले स्वप्न आपण निश्चितपणे साकार करू, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाला मनःपूर्वक सलाम केला. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांना पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या असून बल्लारपूरची ही कामगिरी भाजपच्या मजबूत संघटनशक्तीचे आणि कार्यकर्त्यांच्या राष्ट्रहिताच्या बांधिलकीचे प्रतीक असल्याचे म्हटले आहे.








