व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Legislative election: विप्लव बाजोरियांना तूर्तास दिलासा नाही; पुढील सुनावणी १७ जूनला

Legislative election: विप्लव बाजोरियांना तूर्तास दिलासा नाही; पुढील सुनावणी १७ जूनला

No relief to viplav bajoria, next hearing on 17th June : 18 जूनला निवडणूक; सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता

Amravati अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज बाद झालेल्या अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून तूर्तास कोणताही दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर प्रकरणाची पुढील सुनावणी १७ जून रोजी ठेवली आहे. दरम्यान, बाजोरिया सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषद निवडणूक १८ जून रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी २५ मे ते १ जून या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. शिवसेनेचे माजी आमदार विप्लव बाजोरिया यांनी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केला होता.

Akola congress: नव्या नियुक्त्यांनंतर अकोला काँग्रेसमध्ये नाराजी; ‘सृजन’ अभियानाचा परिणाम

मात्र, छाननीदरम्यान त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. उर्वरित चार उमेदवारांनी बाजोरिया यांच्या शपथपत्रातील त्रुटींवर आक्षेप घेतला होता. त्यांच्या २७ पानांच्या अर्जामध्ये शपथपत्र केवळ पान क्रमांक १ ते ११ पर्यंतच असल्याचे, तर उर्वरित पाने स्वतंत्र परिशिष्ट (ॲनेक्सर) असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
मालमत्ता, गुन्हेगारी पार्श्वभूमी, दायित्वे आणि वैयक्तिक माहिती यांसारख्या महत्त्वाच्या बाबी शपथपत्राचा भाग नसल्याने अर्ज अपूर्ण असल्याचा दावा करण्यात आला. संबंधित युक्तिवाद आणि निवडणूक प्रक्रियेतील कायदेशीर तरतुदींच्या आधारे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बाजोरिया यांचा अर्ज बाद केला.

या निर्णयाला आव्हान देत बाजोरिया यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. दरम्यान, इतर चार उमेदवारांनीही न्यायालयात ‘कॅव्हेट’ दाखल केल्याने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेण्यात आला. सुनावणीनंतर न्यायालयाने तातडीचा कोणताही दिलासा न देता पुढील सुनावणीची तारीख १७ जून निश्चित केली.

Sanjay Gaikwad: माझ्या मतदारसंघातही हस्तक्षेप होतोय; संजय गायकवाडांचा अब्दुल सत्तारांच्या सुरात सूर

सुनावणीदरम्यान बाजोरिया यांच्यावतीने ॲड. रेणुका सिरपूरकर यांनी बाजू मांडली. तर प्रवीण पोटे यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ सुनील मनोहर, हर्षजीत देशमुख यांच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ महेंद्र भांगडे आणि अपक्ष उमेदवार प्रशांत महल्ले यांच्यावतीने ॲड. ऋषिकेश मार्डीकर यांनी युक्तिवाद केला. अमरावतीतील ॲड. प्रशांत देशपांडे, ॲड. चंद्रशेखर डोरले आणि ॲड. संदीप गुप्ता यांनीही संबंधित पक्षकारांच्या वतीने सहकार्य केले.

error: Content is protected !!