Navneet rana clarifies how she missed rajya sabha seat : उपमुख्यमंत्र्यांनी ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट
Nagpur राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मला स्वतः राज्यसभेची ऑफर दिली होती आणि यासाठी भाजपचाही कोणताही विरोध नव्हता. मात्र, राज्यसभेवर जाण्यासाठी आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागेल, अशी अट त्यांनी घातली होती. मी भाजप सोडण्यास आणि राष्ट्रवादीत प्रवेश करण्यास स्पष्ट नकार दिला; म्हणूनच माझी राज्यसभेची संधी हुकली, असा खळबळजनक आणि थेट दावा माजी खासदार नवनीत राणा यांनी केला आहे.
सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर प्रफुल पटेल यांचे खंदे समर्थक राजेंद्र जैन यांची वर्णी लागल्यानंतर, नवनीत राणा यांनी केलेल्या या खुलाशामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्या अटी मान्य न झाल्यामुळे राजेंद्र जैन यांची लॉटरी लागल्याची चर्चा असतानाच, राणा यांच्या या दाव्याने नवा वाद पेटवला आहे.
Farmers loan waiver : दोन लाख नव्हे, अनेक शेतकऱ्यांना केवळ ५० हजारांचीच कर्जमुक्ती?
नवनीत राणा या आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्याच पाठिंब्यावर अमरावतीमधून खासदार झाल्या होत्या, मात्र त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी देऊनही त्यांचा पराभव झाला होता. पराभवानंतर भाजप त्यांना राज्यसभेवर पाठवून पुनर्वसन करेल, अशी जोरदार चर्चा होती. दरम्यानच्या काळात नवनीत राणा आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीचा फोटो स्वतः राणा यांच्याकडूनच व्हायरल करण्यात आला होता, परंतु जैन यांच्या उमेदवारीनंतर या केवळ अफवा असल्याचे म्हटले जात होते. आता स्वतः नवनीत राणा यांनीच या पडद्यामागील घडामोडींना जाहीर उजाळा देत, राष्ट्रवादीत जाण्यास नकार दिल्यानेच आपले नाव मागे पडल्याचा दावा केला आहे.
Water shortage : जिल्ह्यातील १५८ गावांत पाणीटंचाईचे संकट; ३८ गावांना टँकरचा आधार
या संपूर्ण हायव्होल्टेज राजकीय नाट्यावर बोलताना राज्याचे महसूलमंत्री व अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही अत्यंत सूचक आणि राणा यांच्या दाव्याला बळ देणारे वक्तव्य केले आहे. मध्यंतरी, राज्यसभेवर कुठल्या पक्षाकडून जायचे हा निर्णय नवनीत राणा यांचा स्वतःचा असेल, असे म्हणणाऱ्या बावनकुळे यांनी आज यावर अधिक स्पष्टता दिली. नवनीत राणा या अत्यंत कट्टर हिंदुत्ववादी नेत्या आहेत. त्यामुळेच त्यांना भाजप सोडता आली नाही, असे स्पष्ट शब्दांत बावनकुळे यांनी सांगितले. बावनकुळे यांच्या या विधानावरून नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यसभेची खुली ऑफर होती, यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.








