व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Ashish Jaiswal : राजकारणात खुर्च्या बदलतात, कर्तृत्व नाही! अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडून...

Ashish Jaiswal : राजकारणात खुर्च्या बदलतात, कर्तृत्व नाही! अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडून सुधीरभाऊंच्या कार्यशैलीचे भरभरून कौतुक

Ashish Jaiswal showered praise on Mungantiwar’s work ethic, visionary leadership, and contribution to development : चंद्रपूर येथे २९.९९ कोटींच्या जीएसटी भवनाचे लोकार्पण

Chandrapur : राजकारणात खुर्च्या बदलत राहतात, पण तुम्ही किती दिवस पदावर राहिलात यापेक्षा त्या पदाचा वापर जनतेच्या कल्याणासाठी कसा केला, हे सर्वात महत्त्वाचे असते. आमदार आणि मंत्री म्हणून खोलात जाऊन काम कसे करावे, याचा मोठा प्रभाव माझ्यावर सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या कार्यशैलीमुळे पडला, अशा शब्दांत राज्याचे अर्थराज्यमंत्री व गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी केले.

चंद्रपूर येथील अत्याधुनिक व भव्य अशा ‘जीएसटी भवन’चे (वस्तू व सेवा कर भवन) लोकार्पण अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते संपन्न झाले. या सोहळ्याला चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उइके, खासदार प्रतिभा धानोरकर, महापौर संगीताताई खांडेकर, आमदार देवराव भोंगळे, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतेळे, जीएसटीचे सह आयुक्त संजय पवार, जिल्हाधिकारी वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, जीएसटीचे सहआयुक्त विनोद गवई यांच्यासह अनेक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

Sudhir mungantiwar : कोळसा उत्खननासाठी सुपीक जमीन गमावली, मुनगंटीवारांनी ओळखल्या वेदना, मुख्यमंत्र्यांकडे मागितला न्याय

उद्घाटनपर भाषणात बोलताना नामदार आशिष जयस्वाल म्हणाले, सुधीरभाऊ हे एक आदर्श लोकप्रतिनिधी आहेत. विधानसभेचे कामकाज असो वा मतदारसंघाचा विकास, त्यांचे प्रत्येक गोष्टीकडे अत्यंत बारकाईने लक्ष असते. त्यांच्या याच पद्धतीचा माझ्या राजकीय जीवनावर मोठा प्रभाव पडला. सुधीरभाऊंच्या कार्यालयाचे कामकाज पाहूनच मी माझे स्वतःचे कार्यालय थाटले आहे. राजकीय पक्षांमध्ये आणि नेत्यांमध्ये मतभेद किंवा स्पर्धा असतेच, पण जोपर्यंत आपण स्वतःची कर्तृत्वाची लाईन मोठी करत नाही, तोपर्यंत कोणी मोठे होत नाही, हे सुधीरभाऊंनी आपल्या उत्तुंग कामातून दाखवून दिले आहे.

खनिज संपत्तीचे मोठे योगदान असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याने तब्बल १२२ टक्के जीएसटीचे टार्गेट पूर्ण करून राज्याच्या प्रगतीत सिंहाचा वाटा उचलला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांचे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे स्थान आहे. आपला जिल्हा आणि मतदारसंघाची आर्थिक व भौतिक प्रगती करणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचे कर्तव्य व इच्छा असते. महाराष्ट्राच्या विकासात चंद्रपूर जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न पहिल्या १० जिल्ह्यात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. चंद्रपूर हे खऱ्या अर्थाने राज्याचे ‘ग्रोथ हब’ आणि ‘टायगर कॅपिटल’ असल्याचे जयस्वाल यांनी यावेळी सांगितले.

Sudhir mungantiwar: राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी मुनगंटीवार सरसावले; कर्जमाफीपासून वंचित शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मंत्र्यांसोबत चर्चा

सामान्यतः सरकारी इमारतींचे बांधकाम खराब असते, फर्निचर निकृष्ट दर्जाचे असते आणि नवीन इमारत असूनही पहिल्याच पावसात गळते, असा लोकांचा अनुभव असतो. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) चंद्रपुरात उभारलेले हे जीएसटी भवन अत्यंत उत्कृष्ट दर्जाचे बांधले आहे. हे भवन एक आदर्श मॉडेल असून, शासकीय इमारतींसाठी याच मॉडेलचा स्वीकार केला पाहिजे, असे जयस्वाल म्हणाले.

Sudhir Mungatiwar : चंद्रपूर विकासाला बूस्टर! मुनगंटीवारांची मागणी अन् मुख्यमंत्र्यांचे तातडीचे आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र आणि आर्थिक महासत्ता बनवण्याचा संकल्प केला आहे. या उद्दिष्टाची पूर्तता करण्यासाठी चंद्रपूरचे हे नवनिर्मित जीएसटी भवन मैलाचा दगड ठरेल. नागरिकांना केवळ रोटी, कपडा आणि मकान एवढ्याच मूलभूत गरजा नको असतात, तर त्यापलीकडे जाऊन जागतिक दर्जाच्या आधुनिक सुविधा हव्या असतात. सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री असताना हीच गरज ओळखून फॉरेस्ट अकॅडमी, बांबू संशोधन केंद्र आणि आता जीएसटी भवन यांसारख्या वास्तू उभारून जिल्ह्याचे वैभव वाढवले आहे. मुख्यमंत्री देखील या जिल्ह्याकडे विशेष लक्ष घालत आहेत. मी देशासाठी एक ‘असेट’ आहे, अशी भावना मनात ठेवून प्रत्येकाने देशाच्या विकासात आपले योगदान देण्याचा संकल्प करावा. चंद्रपूरच्या विकासाचा वेग कायम राखत, जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प आहे,” असे अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल म्हणाले.

error: Content is protected !!