व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Operation Lotus : विदर्भात ‘ऑपरेशन कमळ’? उद्धव ठाकरे आपल्या टीमसोबत शुक्रवारी विदर्भात

Operation Lotus : विदर्भात ‘ऑपरेशन कमळ’? उद्धव ठाकरे आपल्या टीमसोबत शुक्रवारी विदर्भात

Uddhav Thackeray Shivsena team in Vidarbha on Friday: यवतमाळातून करणार सुरुवात, नागपुरात होणार जंगी स्वागत

Nagpur लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांना खांद्यावर घेऊन शिवसैनिकांनी विजय मिळवून दिला, त्याच यवतमाळच्या खासदार संजय देशमुख यांच्यासह ६ खासदारांनी गद्दारी केल्याने उद्धव ठाकरे सेनेत मोठी खळबळ उडाली आहे. या धक्क्यानंतर उद्धव ठाकरेंनी आता थेट ‘ऑपरेशन कमळ’ सुरू करण्याचा आक्रमक इशारा दिला आहे. गद्दारांना त्यांच्याच मतदारसंघात जाऊन धडा शिकवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या शुक्रवारी विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत.

या वादळी दौऱ्यात उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेची तोफ संजय राऊत, विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार मिलिंद नार्वेकर आणि युवा नेते सुरज चव्हाण अशी बड्या नेत्यांची फौज विदर्भात दाखल होत आहे. नागपूर विमानतळावरून हा ताफा थेट यवतमाळकडे कूच करणार आहे.

यवतमाळ लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी निष्ठावंतांना न्याय देत संजय देशमुख यांना उमेदवारी दिली होती. शिवसैनिकांनी जीवाचे रान करून शिंदे सेनेच्या माजी खासदार भावना गवळी यांचे साम्राज्य उद्ध्वस्त केले आणि देशमुखांना मोठा विजय मिळवून दिला होता.

Pratibha Dhanorkar: चंद्रपूरच्या विकासाला ‘ब्रेक’; खासदार प्रतिभा धानोरकरांचा फ्लॉप शो

मात्र, मतदारांशी आणि पक्षाशी बेईमानी करत संजय देशमुख यांनी थेट शिंदे सेनेत उडी घेतल्याने शिवसैनिकांना मोठा झटका बसला आहे. आता शिवसैनिकांमध्ये पुन्हा एकदा चैतन्य निर्माण करण्यासाठी आणि गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी ठाकरे विदर्भात येत असून, नागपूर विमानतळावर स्थानिक पदाधिकाऱ्यांमार्फत त्यांच्या भव्य आणि जंगी स्वागताची तयारी केली जात आहे.

या दौऱ्याच्या नियोजनासाठी बुधवारी नागपूरच्या रविभवन येथे संपर्क प्रमुख सतीश हरडे, जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया, महिला आघाडी संघटिका शुशीलाताई नायक, सुरेखा खोब्रागडे, शहर प्रमुख विक्रम राठोड, हरिभाऊ बानाईत आणि उपशहर प्रमुख पंकज अहिरराव यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. नागपूर विमानतळ भगवेमय करून ठाकरेंचे अभूतपूर्व स्वागत करण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे.

Birth date wedding cards : लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख अनिवार्य करण्याची तयारी

यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४० आमदार फोडल्यानंतर शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपवर आंधळा विश्वास ठेवल्याने विदर्भात शिवसेना कमकुवत झाली अशी जाहीर कबुली देत विदर्भावर विशेष लक्ष देण्याची घोषणा केली होती. मात्र, काही दौऱ्यानंतर राऊत विदर्भाकडे फिरकले नव्हते. आता थेट खासदारच फुटल्यामुळे शिवसेना नेतृत्वाला मोठी चपराक बसली असून, खुद्द उद्धव ठाकरे यांनी विदर्भाचा गड राखण्यासाठी आणि गद्दारांना धडा शिकवण्यासाठी स्वतः मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. विदर्भातील ही राजकीय फोडाफोडी ठाकरेंच्या जिव्हारी लागली असून, आता विदर्भाच्या मातीतूनच ते गद्दारी करणाऱ्यांना थेट आव्हान देणार हे स्पष्ट झाले आहे.

error: Content is protected !!