व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Uddhav Thackeray: हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढा, उद्धव ठाकरेंचे...

Uddhav Thackeray: हिंमत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढा, उद्धव ठाकरेंचे आव्हान

resign and face the people again, challenges Uddhav Thackeray : वाशिमच्या सभेत खासदार संजय देशमुख, भाजप आणि शिंदेसेनेवर जोरदार हल्लाबोल

Washim शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी वाशिम येथे आयोजित जाहीर सभेत भाजप, शिंदेसेना आणि यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. “गद्दारी करणाऱ्यांना आता शिवसेनेत थारा नाही. हिंमत असेल तर खासदारपदाचा राजीनामा देऊन पुन्हा जनतेसमोर या,” असे थेट आव्हान त्यांनी दिले.

उद्धव ठाकरे म्हणाले, “काहींनी सत्तेसाठी गद्दारी केली, पण कट्टर शिवसैनिक आजही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पक्ष सोडता येतो; मात्र विचार आणि निष्ठा सोडता येत नाही. शिवसेना ही केवळ माझी नाही, तर हिंदुत्वाची आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची आहे.”

Mpsc new pattern : एमपीएससीचा ऐतिहासिक निर्णय! आता वर्षातून तीन वेळा संधी

राम मंदिराच्या मुद्द्यावरूनही त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधत, “राम मंदिराच्या नावावर राजकारण करणारेच आज हिंदुत्वाशी गद्दारी करत आहेत,” असा आरोप केला.

खासदार संजय देशमुख यांचा उल्लेख करत ठाकरे म्हणाले, “खोके घेऊन खासदार झालेल्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे. लाखो शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. २०१९ मधील कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, असे सांगणारे तुम्ही कोण?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज्यातील सत्तांतरावर टीका करताना ठाकरे म्हणाले, “पक्ष फोडून सत्ता मिळविणाऱ्यांना जनता योग्य वेळी उत्तर देईल. मी हरणार नाही, खचणार नाही आणि शिवसेना झुकणार नाही.”

Raj Thackeray : ‘विश्वास नांगरे पाटील भरकटले’; राज ठाकरेंचा थेट निशाणा

या सभेला खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे, आमदार नितीन देशमुख तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अकोला व वाशिम जिल्ह्यातील पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

error: Content is protected !!