व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir mungantiwar: शेतकऱ्यांना न्याय, दुग्ध व्यवसायाला बळ आणि आरोग्य सुविधांचा विस्तार; मुनगंटीवारांनी...

Sudhir mungantiwar: शेतकऱ्यांना न्याय, दुग्ध व्यवसायाला बळ आणि आरोग्य सुविधांचा विस्तार; मुनगंटीवारांनी त्रिसूत्रीच सांगितली

Sudhir Mungantiwar proposes setting up an Indigenous Cow Research Centre in Vidarbha : विधानसभेत अभ्यासपूर्ण मांडणी, विदर्भात देशी गाय संशोधन केंद्र उभारण्याची सूचना

Mumbai महाराष्ट्र विधानसभेत सन २०२६-२७ च्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेदरम्यान माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी कृषी, दुग्ध व्यवसाय, सार्वजनिक आरोग्य आणि महिला सक्षमीकरणाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी केली. कृषी विभागाच्या बाब क्रमांक ३९ ते ५५ अंतर्गत सादर करण्यात आलेल्या ₹८४३ कोटी ९६ लाखांच्या पुरवणी मागण्या, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या बाब क्रमांक २२२ ते २४३ तसेच दुग्ध व्यवसाय विभागाच्या बाब क्रमांक ६४ व ६५ अंतर्गत मांडण्यात आलेल्या ₹११ कोटी ५९ लाख ५४ हजारांच्या पुरवणी मागण्यांवर बोलताना राज्यातील सुमारे १ कोटी ७१ लाख शेतकऱ्यांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून अनेक विधायक सूचना अभ्यासपूर्ण मांडणी करत त्यांनी सभागृहात मांडल्या.

कृषी विभागावरील चर्चेत मुनगंटीवार यांनी कृषी समृद्धी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ वेळेत मिळण्यासाठी कृषी यंत्रणा सक्षम असणे आवश्यक असल्याचे सांगत तालुका कृषी अधिकाऱ्यांना क्षेत्रीय कामकाजासाठी आवश्यक वाहने उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच एक रुपयातील पीक विमा योजनेसोबतच शेतीच्या पायाभूत सुविधांमध्ये अधिक गुंतवणूक करून दीर्घकालीन कृषी विकासाला चालना देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

TET paper leak: टीईटी पेपरफुटी प्रकरण : प्रश्नपत्रिका महाराष्ट्रातच छापा; आ. सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत ठाम मागणी

बनावट बियाणे, निकृष्ट खते आणि कृषी निविष्ठांमधील फसवणुकीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे नमूद करत अशा प्रकरणांवर तातडीने कारवाई व न्याय मिळण्यासाठी स्वतंत्र ‘अॅग्रीकल्चर ऑफेन्स विंग’ आणि फास्ट ट्रॅक न्यायव्यवस्था उभारण्याची सूचना मुनगंटीवार यांनी केली. शेतकऱ्यांना विविध योजनांचे अनुदान वेळेत मिळावे, तसेच उद्योगांसाठी उभारण्यात येणाऱ्या ट्रान्समिशन लाईनच्या खांबांमुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारभावानुसार योग्य मोबदला अथवा न्याय्य भरपाई देण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याची मागणीही त्यांनी केली.

दुग्ध व्यवसाय विभागाच्या पुरवणी मागण्यांवर बोलताना ₹११ कोटी ५९ लाख ५४ हजारांची तरतूद राज्याच्या गरजांच्या तुलनेत वाढविण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. देशी गायींचे संवर्धन, संशोधन आणि दूध उत्पादन वाढीसाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात यावी, तसेच विदर्भात स्वतंत्र देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. उत्पादन शुल्कातून मिळणाऱ्या महसुलातील काही हिस्सा दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी राखून ठेवण्याचाही त्यांनी प्रस्ताव मांडला.

Sudhir mungantiwar : मोरवा येथील चिमुकलीवरील अत्याचारप्रकरणी मुनगंटीवार आक्रमक

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या चर्चेत राज्यात सुरू करण्यात आलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांचे स्वागत करत या महाविद्यालयांमधील डॉक्टर, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. विद्यमान आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे कायम ठेवण्यासोबतच चंद्रपूर येथे महिला विद्यार्थिनी आणि कामकाजी महिलांसाठी ‘सखी निवास’, ‘जिजाऊ वसतिगृह’ किंवा ‘शक्ती सदन’ यांसारखे वसतिगृह उभारण्याची मागणी त्यांनी केली.

राज्य सरकार शेतकरी, दुग्ध व्यवसाय, आरोग्य आणि ग्रामीण विकास क्षेत्रात सकारात्मक पावले उचलत असून, सभागृहात मांडलेल्या सूचनांचा आणि मागणीबाबत गांभीर्याने विचार करून प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी, अशी अपेक्षा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

error: Content is protected !!