व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण Chandrashekhar bawankule : सिद्धिविनायक मंदिरात चोरी झाली तेव्हा उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागितला...

Chandrashekhar bawankule : सिद्धिविनायक मंदिरात चोरी झाली तेव्हा उद्धव ठाकरेंचा राजीनामा मागितला होता का?

Chandrashekhar bawankule attacks Uddhav Thackeray Shivsena on siddhivinayak temple theft : चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट सवाल, चोरी झाली तेव्हा ठाकरे अध्यक्ष असल्याची करून दिली आठवण

Nagpur “मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जेव्हा चोरीची घटना घडली होती, तेव्हा त्याचे अध्यक्ष उद्धव ठाकरे होते. परंतु, आम्ही कधीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती. मंदिरातील एखाद्या कर्मचाऱ्याने चुकीचे कृत्य केले, तर कारवाई त्या कर्मचाऱ्यावर झाली पाहिजे; थेट अध्यक्षांचा राजीनामा मागणे पूर्णपणे अयोग्य आहे,” अशा शब्दांत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विरोधकांवर तोफ डागली आहे.

नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून विरोधकांकडून सुरू असलेल्या आंदोलनाचा आणि संघ परिवाराला लक्ष्य करण्याच्या प्रयत्नांचा समाचार घेताना त्यांनी मंदिरांमधील चोरीच्या घटनांचा हा महत्त्वपूर्ण दाखला दिला.

Malkapur APMC : ‘आठ महिन्यांचा फॉर्म्युला’ दीड वर्ष ओलांडला; सभापतीपदावरून कुजबूज

बावनकुळे पुढे म्हणाले की, अयोध्येतील राम मंदिरातील कथित गैरप्रकाराच्या संदर्भातही सरकारने तातडीने पावले उचलून संबंधितांवर कडक कारवाई केली आहे. एखाद्या कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक चुकीसाठी किंवा गैरप्रकारासाठी संपूर्ण व्यवस्थेला अथवा संस्थाप्रमुखाला जबाबदार धरणे चुकीचे आहे. याच धर्तीवर, नीट पेपरफुटीप्रकरणी दोषींवर कारवाई झालेली असतानाही, केवळ राजकीय स्वार्थापोटी केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणे अजिबात योग्य नाही, असे सांगत त्यांनी विरोधकांचे आंदोलन म्हणजे निव्वळ राजकारण असल्याचे स्पष्ट केले.

नीट परीक्षा प्रकरणावरून सरकारविरोधात सुरू असलेले आंदोलन हे ठोस मुद्द्यांवर आधारित नसून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी जाणीवपूर्वक रचलेले राजकीय षड्यंत्र आहे, असा घणाघाती आरोप महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. विरोधकांकडे जनतेसमोर मांडण्यासाठी कोणतेही ठोस मुद्दे उरले नसल्यानेच युवकांची दिशाभूल केली जात असल्याचा दावा त्यांनी केला.

Sanjay Savkare : सावकारे आले… पण आता जिल्ह्यात नियमित दिसणार का?; सहपालकमंत्र्यांच्या भूमिकेवर पुन्हा चर्चा

बावनकुळे म्हणाले की, नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे काही युवक मनस्तापातून आंदोलनात सहभागी झाले असतील; मात्र सरकारने यावर कोणतीही कारवाई केली नाही असा याचा अर्थ होत नाही. पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनाही केल्या आहेत. त्यानंतर नीट परीक्षा योग्य पद्धतीने पार पडली आहे.

विरोधकांना सवाल करताना ते म्हणाले, आमच्या कोणत्या मंत्र्याने पेपर लीक केला होता का? एखाद्या व्यक्तीने गैरप्रकार केला असेल तर त्याची शिक्षा त्यालाच झाली पाहिजे. सुधारणा सुचविणे योग्य आहे; मात्र मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करून राजकारण करणे चुकीचे आहे.

error: Content is protected !!