व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Aditi Tatkare : “लाडक्या बहिणींनी ₹1500 फक्त खरेदीवर खर्च करू नये !

Aditi Tatkare : “लाडक्या बहिणींनी ₹1500 फक्त खरेदीवर खर्च करू नये !

aditi-tatkare-advises-ladki-bahin-save-money-instead-spending-on-shopping : भविष्यासाठी बचत करा”, मंत्री आदिती तटकरेंचा महत्त्वाचा सल्ला

Mumbai : राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आर्थिक नियोजनाचा महत्त्वाचा सल्ला दिला आहे. योजनेअंतर्गत मिळणारे ₹1500 पूर्णपणे खरेदीवर खर्च न करता त्यातील काही रक्कम भविष्यासाठी बचत करावी, असे आवाहन त्यांनी केले. बचतीची सवय लावल्यास पुढील काळात त्याचा मोठा फायदा होऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आदिती तटकरे या वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना नव्याने उभारण्यात आलेल्या महिला व बालकल्याण कार्यालयाच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी त्यांनी महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि नियोजनाचे महत्त्व पटवून देताना हा सल्ला दिला.

Sharad Pawar : ‘युवाशक्तीच्या एकजुटीचा हा विजय’

यावेळी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या की, सरकारकडून मिळणारी संपूर्ण रक्कम खरेदीसाठी खर्च करण्यापेक्षा त्यातील चारशे-पाचशे रुपये बचत गट, बँक किंवा पतसंस्थेत जमा करावेत. नियमित बचत केल्यास भविष्यात आर्थिक गरजांच्या वेळी त्याचा मोठा आधार मिळू शकतो. महिलांनी केवळ खर्च न करता आर्थिक शिस्तही अंगीकारावी, असे त्यांनी सांगितले.

आपल्या भाषणात आदिती तटकरे यांनी एक रंजक किस्साही सांगितला. त्या म्हणाल्या की, शहरातील व्यापारी अनेकदा त्यांना “लाडक्या बहिणींचे पैसे कधी जमा होणार?” अशी विचारणा करतात. सुरुवातीला हा प्रश्न ऐकून आश्चर्य वाटले. त्यानंतर एका व्यापाऱ्याला यामागचे कारण विचारले असता त्याने दिलेले उत्तर लक्षवेधी होते.

Devendra Fadnavis : धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग

त्या व्यापाऱ्याने सांगितले की, लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बाजारपेठेत मोठी गर्दी होते आणि खरेदीला चांगली चालना मिळते. त्यामुळे व्यापारीही या निधीची आतुरतेने वाट पाहत असतात, असे आदिती तटकरे यांनी सांगितले.
आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक आधार देण्याबरोबरच त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हाही आहे. त्यामुळे लाभार्थींनी मिळालेल्या रकमेचा सुयोग्य वापर करत बचतीची सवय लावल्यास भविष्यातील गरजा, आपत्कालीन परिस्थिती किंवा लहान-मोठ्या गुंतवणुकीसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो.
महिलांनी योजनेंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीकडे केवळ खर्चासाठी मिळालेली रक्कम म्हणून न पाहता, भविष्यातील आर्थिक सुरक्षिततेची सुरुवात म्हणून पाहावे, असा संदेशही त्यांनी यावेळी दिला.

error: Content is protected !!