व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण District bank election : काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या अर्जाला भाजपशी संबंधित प्रतिनिधीचे अनुमोदन; सहकारातील...

District bank election : काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या अर्जाला भाजपशी संबंधित प्रतिनिधीचे अनुमोदन; सहकारातील नव्या समीकरणांची चर्चा

Congress district president’s nomination seconded by a BJP-affiliated representative : जिल्हा बँक निवडणुकीत राजकीय गणित बदलले? काँग्रेस-भाजप स्थानिक समीकरणांवर तर्क-वितर्क

Buldhana बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश अवचार यांच्या उमेदवारी अर्जावर भाजपशी संबंधित बँक प्रतिनिधीने अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केल्याची बाब जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. परंपरेने परस्परविरोधी मानल्या जाणाऱ्या दोन पक्षांशी संबंधित व्यक्तींमध्ये स्थानिक पातळीवर दिसून आलेल्या या घडामोडीमुळे सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

यापूर्वी जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही स्थानिक राजकीय समीकरणांमुळे काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यानंतर आता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत घडलेल्या या प्रकारामुळे सहकारातील स्थानिक साटेलोटे आणि राजकीय व्यवहार्यता यावर विविध स्तरांत चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, या विषयावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश अवचार यांनी हा प्रकार राजकीय आघाडीचा नसून सहकार क्षेत्रातील निवडणुकांचे स्वरूप वेगळे असल्याचे स्पष्ट केले. “सहकार क्षेत्रातील निवडणुका पक्षाच्या चिन्हावर होत नाहीत. येथे पक्षीय राजकारणापेक्षा मतांचे गणित आणि स्थानिक परिस्थिती अधिक महत्त्वाची असते. विविध व्यक्तींचा पाठिंबा मिळणे ही निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे. एखादी व्यक्ती स्वतःहून सूचक किंवा अनुमोदक होत असेल, तर त्याला नकार देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे त्यांनी सांगितले.

Cabinet decision : ग्रामपंचायत सदस्यांना १२ महिन्यांत सादर करावे लागणार जात वैधता प्रमाणपत्र

अवचार यांच्या या स्पष्टीकरणानंतरही स्थानिक राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, काँग्रेसचे वरिष्ठ नेतृत्व या घडामोडीकडे कोणत्या दृष्टीने पाहते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. सहकारातील निवडणुकांमध्ये पक्षीय सीमा कितपत प्रभावी राहतात आणि स्थानिक स्तरावरील राजकीय व्यवहार्यता किती महत्त्वाची ठरते, याविषयीही चर्चा सुरू आहे.

Harshwardhan Sapkal : भाजपा सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही, पेपरफुटीचे रॅकेटला कुणाचा वरदहस्त?

दरम्यान, या घटनेमुळे आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीतील राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, तसेच इतर उमेदवारांच्या रणनीतीत काही बदल होतात का, याकडेही राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!