व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir Mungantiwar: मुनगंटीवारांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर जिल्हा सेवामय; ३० जुलैला समाजोपयोगी उपक्रमांचा महोत्सव!

Sudhir Mungantiwar: मुनगंटीवारांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर जिल्हा सेवामय; ३० जुलैला समाजोपयोगी उपक्रमांचा महोत्सव!

blood donation camp, food distribution and tree plantation drive to be held in Chandrapur on July 30 to mark Sudhir Mungantiwar’s birthday : जिल्हाभर सामाजिक उपक्रमांची पर्वणी; ६३ ठिकाणी महाआरती, रक्तदान, वृक्षारोपण, अन्नदानसह चंद्रपूर शहरभर समाजोपयोगी उपक्रमांची रेलचेल*

Chandrapur लोकनेते आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या ३० जुलैच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर जिल्हा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा मोडताना दिसणार आहे. सत्काराऐवजी समाजकारण, जल्लोषाऐवजी जनकल्याण आणि शुभेच्छांऐवजी समाजोपयोगी कृतीचा संकल्प करत जिल्हाभर रक्तदान, महाआरोग्य शिबिरे, वृक्षारोपण, अन्नदान, रुग्णसेवा, गौसेवा, स्वच्छता अभियान, शैक्षणिक साहित्य वाटप अशा शेकडो उपक्रमांचा महापूर उसळणार आहे. जनतेसाठी आयुष्यभर झटणाऱ्या नेतृत्वाला कृतीतून सलाम करण्यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्र येत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यालाच समाजसेवेच्या विराट उत्सवात बदलण्याची तयारी पूर्ण केली आहे.

लोकनेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या ३० जुलै रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर शहरात समाजहिताला केंद्रस्थानी ठेवून विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. वाढदिवस हा केवळ शुभेच्छांचा दिवस न ठरता समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मानत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक,विविध सामाजिक संस्थांच्या पुढाकारातून रक्तदान, वृक्षारोपण, अन्नदान, शैक्षणिक साहित्य वाटप, रुग्णसेवा, गरजूंना मदत अशा उपक्रमांची दिवसभर रेलचेल राहणार आहे.

Sudhir Mungatiwar : मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आणखी एक विक्रम; ‘मन की बात’च्या ऑनलाइन प्रतिसादात महाराष्ट्रात बल्लारपूर अव्वल!

याअंतर्गत गिरनार चौक, खेडुले कुणबी समाज भवन, एसटी वर्कशॉप चौक (तुकूम), बंगाली कॅम्प, शासकीय दूध डेअरीजवळ, रयतवारी, उत्तर भारतीय संघ (तुकूम), माता मंदिर (इंदिरानगर, मुल रोड) तसेच लोकसेवा मंगल कार्यालय (पडोली) येथे रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय वृक्षारोपण सप्ताह, शहरातील ६३ ठिकाणी महाआरती, दर्गा येथे गरजूंना ब्लँकेट वाटप, लहान मुलांना रेनकोट वाटप, गरजूंना ताडपत्री वितरण, ११ गावांतील विद्यार्थ्यांना नोटबुक व शालेय साहित्य वाटप, महाकाली मंदिर येथे मसाला भात वाटप, शासकीय रुग्णालयात रुग्णांना फळवाटप तसेच वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना ब्लँकेट वाटप असे विविध समाजोपयोगी उपक्रम ३० जुलै रोजी राबविण्यात येणार आहेत.

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सेवा, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा उत्सव साजरा होत आहे. विशेष म्हणजे वरोरा, घुग्घुस, पोंभूर्णा, मुल, राजुरा, गोंडपिपरी, विसापूर आणि दुर्गापूर येथे भव्य महारक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून, शेकडो रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग अपेक्षित आहे. गरजू रुग्णांना जीवनदान देणारा हा उपक्रम वाढदिवसाचे सर्वात अर्थपूर्ण स्वरूप ठरणार आहे.

Sudhir mungantiwar: मुनगंटीवारांचा पाठपुरावा अन् चंद्रपूर सीजीएचएस वेलनेस सेंटरच्या रिक्त पदभरतीला मिळाली गती

भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक, शैक्षणिक आणि नागरी संस्थांच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्ह्यात अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे . त्यामध्ये महाप्रसाद, महाआरती, विकासाची ज्योत रॅली, रक्तदान शिबिरे, रक्तदाब व मधुमेह तपासणी, आधार काठी वाटप, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, युवती मॅरेथॉन, महिला मॅरेथॉन तसेच विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन वाटपासारख्या अनेक समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सर्व उपक्रमांतून आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस केवळ शुभेच्छांचा दिवस न राहता समाजसेवा, जनकल्याण आणि लोकहिताच्या कार्याला वाहिलेला खऱ्या अर्थाने ‘सेवा दिवस’ म्हणून संपूर्ण जिल्हाभर साजरा होत आहे.

error: Content is protected !!