व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Sudhir Mungatiwar : मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आणखी एक विक्रम; ‘मन की बात’च्या...

Sudhir Mungatiwar : मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आणखी एक विक्रम; ‘मन की बात’च्या ऑनलाइन प्रतिसादात महाराष्ट्रात बल्लारपूर अव्वल!

३६६ पैकी ३६६ बूथवर शंभर टक्के आयोजन; १०,८६८ नागरिकांचा सहभाग, सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाची पुन्हा राज्यात दखल

चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १३६ व्या भागात बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाने महाराष्ट्रात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक ऑनलाइन प्रेक्षकसंख्या नोंदवत बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ राज्यात प्रथम ठरला, तर विधानसभा क्षेत्रातील ३६६ पैकी ३६६ बूथवर शंभर टक्के आयोजन करून संघटनात्मक ताकदीचा प्रभावी ठसा उमटविला. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या अभूतपूर्व नियोजनाची राज्यभरात चर्चा होत आहे.

‘मन की बात’ कार्यक्रमासाठी १०,८६८ नागरिकांनी प्रत्यक्ष व ऑनलाइन सहभाग नोंदविला. राज्यातील इतर सर्व विधानसभा मतदारसंघांना मागे टाकत ऑनलाइन प्रेक्षकसंख्येत बल्लारपूरने महाराष्ट्रात अव्वल स्थान मिळविले, ही भाजपच्या संघटनशक्तीची आणि कार्यकर्त्यांच्या समर्पित परिश्रमांची ठळक पावती मानली जात आहे.

Exam reform bill : पेपरफुटीवर केंद्राचा निर्णायक प्रहार; 10 वर्षांचा तुरुंगवास, ₹10 कोटी दंडाची तरतूद !

या उल्लेखनीय यशामागे आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मार्गदर्शन आणि सर्व मंडळ पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचा सिंहाचा वाटा आहे.
कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजसेवा, पर्यावरण संवर्धन, आत्मनिर्भर भारत, नवकल्पना, जनसहभाग आणि राष्ट्रनिर्माण याविषयी प्रेरणादायी विचार मांडले. या विचारांचा संदेश प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावा यासाठी प्रत्येक बूथवर नागरिकांना एकत्र आणून कार्यक्रमाचे प्रभावी आयोजन करण्यात आले.

Aditi Tatkare : “लाडक्या बहिणींनी ₹1500 फक्त खरेदीवर खर्च करू नये !

 

महाराष्ट्रात सर्वाधिक ऑनलाइन प्रतिसाद आणि शंभर टक्के बूथ आयोजनाचा दुहेरी मान मिळविल्यामुळे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाने पुन्हा एकदा राज्यात आपला संघटनात्मक दबदबा सिद्ध केला आहे. या यशाबद्दल सर्व बूथ अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सहभागी नागरिकांचे अभिनंदन करण्यात आले असून, आगामी काळातही जनसंपर्क आणि राष्ट्रहिताची जनजागृती अधिक व्यापक करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.

error: Content is protected !!