After resigning from Congress, Dr. Abhay Patil meets Eknath Shinde : राजकीय चर्चांना उधाण; पदवीधर मतदारसंघातून उमेदवारीची चर्चा
Akola हिंदुत्ववादी विचारसरणीचे नेते म्हणून ओळख असलेले डॉ. अभय पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीनंतर डॉ. पाटील लवकरच शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉ. पाटील यांना शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी त्यांच्या भेटीमुळे विविध राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
डॉ. अभय पाटील यांनी यापूर्वी 2024 मध्ये काँग्रेसचे उमेदवार म्हणून अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत पक्षाचा निरोप घेतला. त्यानंतर ते स्वतंत्रपणे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत.
Disqualification notices: २३ नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिस, भाजपसह एमआयएमच्या नेत्यांवर संकट
संघर्षशील आणि हिंदुत्ववादी नेता म्हणून ओळख असलेल्या डॉ. पाटील यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशामुळे विदर्भातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यांच्या पक्षप्रवेशाबाबत किंवा उमेदवारीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.








