व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home राजकारण prashant pawar : सपकाळांना काळे फासणाऱ्याला १ लाखांचे बक्षीस जाहीर!

prashant pawar : सपकाळांना काळे फासणाऱ्याला १ लाखांचे बक्षीस जाहीर!

politics-row-over-gungi-gudiya-remark-prashant-pawar-announces-reward-against-harshvardhan-sapkal : ‘गुंगी गुडिया’ विधानावरून राजकारण तापले

Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने केलेल्या वादग्रस्त विधानावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा संघर्ष पेटला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सुनेत्रा पवार यांचा “गुंगी गुडिया” असा अवमानकारक उल्लेख केल्यामुळे महायुतीचे नेते आणि कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले आहेत. या वक्तव्याच्या निषेधार्थ नागपूर आणि नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले असून, नागपूरमध्ये संतप्त आंदोलकांनी सपकाळ यांच्या प्रतिमेला चपलांचा चोप देत निषेध व्यक्त केला.

Eknath Shinde : कामात सुधारणा करा, अन्यथा खांदेपालट अटळ

दरम्यान, या वादात आणखी भर पडली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रशांत पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या तोंडाला काळे फासणाऱ्याला एक लाख रुपये, तर कपडे फाडणाऱ्याला ५० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या घोषणेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले असून, या प्रकरणाचे पडसाद आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एका बाजूला संतप्त प्रतिक्रिया आणि बक्षिसांची घोषणा होत असताना, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम राहिले आहेत. “गुंगी गुडिया” हा उल्लेख योग्य असल्याचे सांगत, “त्या तशा नसतील तर सुनेत्रा पवार यांनी दुर्गा होऊन दाखवावे,” असे उघड आव्हान त्यांनी दिले आहे. अजित पवार यांच्या अपघाताचा रखडलेला तपास, लाडक्या बहिणी योजनेतील मदतवाढ आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमारासारख्या मुद्द्यांवर उपमुख्यमंत्री या नात्याने सुनेत्रा पवार यांनी सरकारविरोधात अधिक आक्रमक भूमिका घ्यावी, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
या संपूर्ण प्रकरणामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे. त्यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सपकाळ यांच्या टीकेचे समर्थन केल्याने वादाला आणखी धार आली आहे. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या पत्रकार परिषदेत घुसून जाब विचारल्याने वातावरण तापले होते.

Row over gungi gudiya : सपकाळांच्या प्रतिमेला चपलांचा चोप, राष्ट्रवादी आक्रमक !

सध्या हा वाद केवळ एका विधानापुरता मर्यादित राहिलेला नसून, आगामी काळात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात या प्रकरणाचे पडसाद पुढील काही दिवस उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

error: Content is protected !!