nagpur/politics-praful-gudhe-rejects-apology-demand-and-to-respond-to-dayashankar-tiwari-defamation-warning : नागपूरच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा चांगलाच रंगला
Nagpur: नागपूरच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा चांगलाच रंगला असून, भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल गुडधे यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. आपल्यावरील आर्थिक आरोप आणि ‘अंडरस्टँडिंग’बाबतचे वक्तव्य निराधार असल्याचा दावा करत तिवारी यांनी ४८ तासांच्या आत जाहीर माफी मागण्याची मागणी केली आहे. अन्यथा, एक कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल, असा सज्जड इशारा त्यांनी दिला आहे. मात्र, या इशाऱ्याला न जुमानता प्रफुल गुडधे यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार देत जोरदार प्रत्युत्तर देण्याचा पवित्रा घेतला आहे.
काही दिवसांपूर्वी प्रफुल गुडधे यांनी एक व्हिडिओ प्रसारित केला होता. नोटा मोजतानाचा हा व्हिडिओ नागपुरात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. याच व्हिडिओच्या आधारे गुडधे यांनी, “पंडित दयाशंकर तिवारी हे अत्यंत विद्वान आहेत. ते स्थायी समितीचे अध्यक्ष असताना मी सदस्य होतो, त्यामुळे त्यांचे व्यवहार मला चांगलेच ठाऊक आहेत,” असे म्हणत तिवारी यांच्यावर गंभीर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले होते.
prashant pawar : सपकाळांना काळे फासणाऱ्याला १ लाखांचे बक्षीस जाहीर!
या आरोपांवर संताप व्यक्त करत दयाशंकर तिवारी यांनी, “माझी कार्यशैली प्रत्येक नागपूरकराला माहिती आहे. प्रफुल गुडधे यांनी केलेले आरोप सिद्ध करावेत किंवा ४८ तासांच्या आत जाहीर माफी मागावी. अन्यथा, त्यांच्याविरोधात एक कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करण्यात येईल,” असा इशारा दिला होता.
Row over gungi gudiya : सपकाळांच्या प्रतिमेला चपलांचा चोप, राष्ट्रवादी आक्रमक !
दरम्यान, या इशाऱ्याला प्रत्युत्तर देताना प्रफुल गुडधे यांनी माफी मागण्यास स्पष्ट नकार दिला आहे. “मी प्रसारित केलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये कोणाचेही नाव घेतलेले नाही किंवा थेट कोणावर आरोप केलेले नाहीत. पैसे मोजतानाचा तो व्हिडिओ दयाशंकर तिवारी यांनी एवढा वैयक्तिक का घेतला आणि त्याचा परस्पर काय अर्थ काढला, हा त्यांचा प्रश्न आहे,” असे गुडधे यांनी म्हटले आहे.
सध्या आपण दिल्लीमध्ये असून, पुढील दोन दिवसांत या संपूर्ण प्रकरणावर सविस्तर भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नागपूरच्या राजकारणात सुरू झालेला हा आरोप-प्रत्यारोपांचा सामना आगामी काळात आणखी रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








