prashant-kishor-meets-dcm-sunetra-pawar-political-speculations-intensify : महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण, नव्या समीकरणांची चर्चा
Mumbai : जनसुराज्य पक्षाचे नवनिर्वाचित आमदार तसेच देशातील ख्यातनाम निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची अचानक भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस हा भाजपप्रणीत महायुती सरकारमधील महत्त्वाचा घटक पक्ष आहे, तर दुसरीकडे प्रशांत किशोर यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजप समर्थित उमेदवाराचा पराभव करून विधानसभेत दमदार प्रवेश केला आहे. त्यामुळे या भेटीने राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटले आहे.
निवडणूक रणनीतिकार म्हणून प्रशांत किशोर यांनी यापूर्वी भाजप, काँग्रेस, ममता बॅनर्जी तसेच उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांसाठी काम केले आहे. त्यानंतर त्यांनी ‘जनसुराज्य पक्ष’ स्थापन करून स्वतंत्र राजकीय वाटचाल सुरू केली. बिहारमधील राजकीय संघर्षात भाजप उमेदवाराचा पराभव करून त्यांनी स्वतःच्या राजकीय ताकदीची झलक दाखवून दिली आहे. अशा पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांनी थेट महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
Dhanushyaban case धनुष्यबाणाचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयात !
दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार गट आणि शरद पवार गट पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यातच मागील आठवड्यात शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने या चर्चांना आणखी बळ मिळाले आहे. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाला अजित पवार यांच्या पक्षातील काही नेत्यांचा विरोध असल्याचीही चर्चा आहे.
Master plan : नाराज जेनझीला पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी फडणवीस सरकारचा ‘मास्टरप्लॅन’
या सर्व राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीकडे विशेष लक्ष लागले आहे. या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, प्रशांत किशोर यांनी कोणता राजकीय सल्ला दिला आणि आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात कोणती नवी समीकरणे पाहायला मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.








