व्हाट्सअप चॅनेल फॉलो करा
Home महाराष्ट्र Teacher Recruitment : राज्यात शिक्षक भरतीचा बिगुल; ३०,२०९ पदांची मेगा भरती

Teacher Recruitment : राज्यात शिक्षक भरतीचा बिगुल; ३०,२०९ पदांची मेगा भरती

maharashtra-teacher-recruitment-30209-teacher-vacancies-through-pavitra-portal : ११ ऑगस्टपर्यंत प्राधान्यक्रम नोंदविण्याची संधी

Mumbai: शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय शाळा आणि खासगी अनुदानित शाळांमधील तब्बल ३० हजार २०९ रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पवित्र (पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टीचर्स रिक्रूटमेंट) या संकेतस्थळाच्या माध्यमातून ही भरती राबविण्यात येणार असून, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी उत्तीर्ण उमेदवारांना ११ ऑगस्टपर्यंत पदांसाठी प्राधान्यक्रम नोंदविण्याची संधी देण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या निर्देशानुसार पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षण सेवक आणि शिक्षक पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. संबंधित व्यवस्थापनातील रिक्त जागा, आरक्षणाची स्थिती आणि उपलब्ध पदांची संख्या लक्षात घेऊन एकूण ८० टक्के पदांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पवित्र पोर्टलवरील जाहिरात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हा परिषदांच्या १३ हजार ३५२, महानगरपालिकांच्या एक हजार ९५४, नगरपालिकांच्या २८० आणि खासगी शैक्षणिक संस्थांमधील १२ हजार १४८ अशा एकूण ३० हजार २०९ रिक्त पदांसाठी भरती होणार आहे. उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार पदनिहाय प्राधान्यक्रम निश्चित करण्यासाठी आवश्यक सूचना पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. याशिवाय, उमेदवारांना एसएमएसद्वारेही माहिती पाठविण्यात येत आहे.

Raj Thackeray : कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार का? प्रत्येकाला फक्त कमिशनची चिंता

उमेदवारांनी संबंधित संकेतस्थळावर लॉगिन करून प्रथम प्राधान्यक्रम तयार करणे आवश्यक आहे. त्यानंतर ६ ऑगस्ट २०२६ ते ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पदनिहाय पसंतीक्रम नोंदवून तो लॉक करावा लागणार आहे. निर्धारित मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास उमेदवारांना पुढील टप्प्यात सहभागी होता येणार नाही.

Prashant Kishor : ‘माझ्यासोबत काम करायचे असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत ठोस निर्णय घ्या’

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार असून, या भरती प्रक्रियेत मुलाखत घेतली जाणार नाही. प्राधान्यक्रम नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यामुळे राज्यातील शिक्षक भरती प्रक्रियेला वेग आला असून, पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी मानली जात आहे.

error: Content is protected !!